काल सकाळी एक भगांरवाला ओरडत होता .. त्याचा आवाज आल्यावर मी गेटपाशी गेले.. माझ्याकडे काही वस्तु त्याला द्यायच्या होत्या त्या दिल्या आणि सहज लक्ष गेलं ते वह्या पुस्तकाकडे ज्या कोणीतरी भंगारमधे दिल्या होत्या.. मी एक वही हातात घेतली आणि सहज पानं उलटली तर असं लक्षात आलं की , त्या वहीतील ८/१० पाने लिहीलेली होती आणि उरलेली पाने अशीच कोरी होती.. कुतूहलाने पुस्तके चाळली आणि पुन्हा एक वही उघडली तर तिचीही तीच अवस्था .. पाहून नक्कीच वाईट वाटलं आणि मी जवळपास ४२/४५ वर्षे मागे गेले.. आमच्या गावात आणि माझ्या घरात मी २/3 जणानी वापरलेली पुस्तके वापरत असे आणि एखाद्या वहीत जरी एखादं पान जरी शिल्लक राहिले तर ते काढुन किवा इतर वहीतील उरलेली पाने काढून ती शिवुन त्यातुन नवीन २/३ वह्या सहज तयार व्हायच्या .
. त्या वापरुन आम्ही शिकलो.. कायम निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा यात प्रथम क्रमांक पटकावला.. कारण आम्हाला अभ्यासाशी देणं घेणं होतं.. जिची आपण सरस्वती म्हणुन पुजा करतो तिला किती सहज भंगारात फेकून देतो ना.. खेड्यात आजही अशी कितीतरी मुलं असतील जी शिक्षणापासून वंचित असतील.. कितीतरी पालकांकडे मुलांना वह्या पुस्तके , पेंसील द्यायला पैसे नसतील .. सगळी पुस्तके मी भंगारवाल्याकडुन विकत घेतली आणि सोसायटीमधे झाडणाऱ्या बाईला देउन टाकली आणि तिला म्हटलं , तुझ्या मुलांना उपयोग नाही झाला तर आजूबाजूला कोणाला तरी दे आणि मी माझ्या कामाला लागले..
आज सकाळी त्या कामवाल्या मावशीने मला बाहेरून हाक मारली आणि म्हणाली , माझ्या नणंदेची मुलगी ४ थीत आहे तिला पुस्तके दिली.. ती वापरेल.. यात माझं कौतुक काहीही नाही.. फक्त मला त्यावेळी ती बुध्दी झाली म्हणु किवा पुस्तके माझ्या नजरेस पडली असं म्हणु. किवा भगवंताने त्या मुलीसाठी माझ्या द्वारे ती पुस्तके पाठवली आणि भंगारवाल्याला पैसेही मिळाले.. एकावेळी दोघांच्या चेहऱ्यावर त्याने हसू आणले फक्त माध्यम म्हणुन मला वापरले… हा किस्सा शेअर यासाठी केलाय , तुमच्या नजरेस जर असं काही पडलं तर योग्य व्यक्तीपर्यंत ते पोचवा.. ही गोष्ट आपल्यासाठी खूप छोटी आहे पण कोणासाठी तर ती हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान ठरु शकते.
कोणी पाहिलय पुढे जाऊन ती ४थीतली मुलगी अशाच कोऱ्या पानावर आपल्यासाठी साहित्य लिहील.. Nothing is Impossible..
आता मी पुस्तक लिहीत बसले असताना माझ्या बाबतीतला सगळा स्ट्रगल नजरेसमोर आला आणि वाटलं फुल ना फुलाची पाकळी म्हणुन साहित्याला आपण योगदान देउ शकतो.. कोरे कागद आणि मेहनत कोणाचेही नशीब घडवु शकतात .जसं माझं बदललं… प्रत्येक वस्तु वापरताना आणि फेकून देताना हजारदा विचार करा कारण तेच कपडे किवा वस्तु कोणाची तरी दिवाळी किवा वाढदिवस साजरे करु शकतात..
आपल्याला जाऊन द्यायला जमलं नाही तर अनेक संस्था अशा प्रकारची कामे करतात त्यांच्या पर्यंत आपण पोचवु शकतो..
चांगल्या कामासाठी आपण माध्यम असायलाच हवं हा विचार कायम हृदयात आणि मनात हवा त्यासाठी कर्म चांगले हवे आणि भगवंतावर विश्वास हवा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
..