कंधार पोलिसांच्या वतीने एकता रॅली काढून शहरात मतदान जनजागृती

 

कंधार प्रतिनिधी

राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यासाठी व समाजातील एकोपा टिकवण्यासाठी राष्ट्रीय सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी समाज समाजात तेढ निर्माण होऊनही म्हणून मिळून मिसळून सण-उत्सव साजरा करावे असा संदेश एकता रॅलीत पहावयास मिळाला व मतदान जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कंधार पोलीस स्टेशनच्या वतीने एकता रॅलीचे आयोजन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता गांधी चौकातील नवा मारोती मंदिर या ठिकाणाहून एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग महाराणा प्रताप चौक पोलीस स्टेशन येथे या रॅलीची सांगता झाली.

या एकता रॅलीमध्ये श्री शिवाजी कॉलेज कंधार, स्वामी रामानंद तीर्थ फार्मसी कॉलेज पोलीस अकॅडमी विविध क्लासेस चे विद्यार्थी या एकता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कंधार पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, एपीआय मुळे, आगलावे गोपनीय नियंत्रण कक्ष पोलिस जमादार गिरे, शेख इम्रान श्री शिवाजी कॉलेजचे प्राचार्य चिवडे प्रदीप गरुडकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य इंगोले विविध क्लासचे प्रमुख तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *