लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिले प्रशिक्षण यशस्वी….. १ हजार ५७१ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणास उपस्थिती तर १०५ कर्मचारी गैरहजर

 

कंधार : प्रतिनिधी

लातूर (अ.जा) लोकसभा मतदार संघ अंतर्गत ८८ लोहा विधानसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर १ हजार ५७१ कर्मचाऱ्यांचे पीपीटी चे प्रशिक्षण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या उपस्थितीत ४ एप्रिल रोजी विक्की गार्डन पारडी लोहा येथे सकाळ व दुपार असा दोन सत्रात पार पडले तर १०५ कर्मचारी गैरहजर राहिले आहेत.

लातूर लोकसभा ( आ जा) मतदार संघात लोहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो पारडी लोहा येथील विक्की गार्डन येथे ४ एप्रिल रोजी सकाळ -दुपार या दोन सत्रात प्रशिक्षण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ३३०मतदान केंद्र असून लोहा तालुक्यात१८३ तर कंधार मध्ये १४७ मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राध्यक्ष ४००, मतदान अधिकारी -एक कर्मचारी -४२५, मतदान अधिकारी २ व ३ कर्मचारी ८२५ असे १ हजार ६७६ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणा आयोजित केले होते यात १०५ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार रेखा चामनार, नायब तहसीलदार संजय भोसीकर, अशोक मोकले, परळकर, पाठक तसेच निवडणूकीसाठी समन्वयक मन्मथ थोटे , तिरुपती मुंगरे, राजेश गायंगे,ईश्वर धुळगंडे, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे यासह सर्व कर्मचारी प्रशिक्षण यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. पारडी येथील विक्की गार्डन येथे दोन सत्रात सकाळी ९ ते ११ व दुपारी १ ते ३ वाजतेच्या दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार आहे.ईव्हीएम मतदान यंत्र हाताळणी नारायणा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल येथे दुपारी१ ते ३ व दुपार सत्रात ३ ते ५ असे प्रशिक्षण पार पडले

निवडणूक ड्युटी रद्द करावी यासाठी जवळपास २२४ हुन अधिक कर्मचाऱ्यांनी आजार, ऑपरेशन व अन्य वैदयकीय कारणे दर्शवित आपली इलेक्शन ड्युटी रद्द करावी असे अर्ज दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *