(कंधार/मो सिकंदर )
केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ व्या लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केलाअसून, जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्व कंधारवासीयांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करत, आगामी सण व उत्सव शांततेत साजरे करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कंधारचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी केले.
गुढीपाडवा,रमजान ईद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्रीराम नवमी निमित्त पोलीस स्टेशन कंधारच्या वतीने दि.५ एप्रिल २०२४ रोज शुक्रवारी सायंकाळी ७ :०० वाजता शांतता कमिटीची बैठकीचे आयोजित करण्यात आले होते, यावेळी कंधार उपविभागीय पोलिस कार्यालयाचे अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे, ज्ञानोबा गिरे, देविदास गित्ते, बापुराव व्यवहारे, संतोष काळे,शेख इम्रान, बालाजी मुसांडे, बालाजी पारदे, भुजंग खेडकर यांच्यासह पोलीस बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी म्हणाले की, यावर्षी एप्रिल महिन्यांमध्ये गुढीपाडवा, रमजान ईद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी आदी सण व उत्सव पार पडणार आहेत. सदरील सण व उत्सव हे सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करावेत. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, विनाकारण सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये. अन्यथा पोलिसांना नविला जास्त कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नये, असेही ते म्हणाले.
याप्रसंगीभारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, सरचिटणीस नामदेव कांबळे, भाजपचे लोकसभा विस्तारक गंगाप्रसाद यन्नावार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अॅड.मारोती पंढरे, संचालक प्रा.शाहुराज गोरे, माजी संचालक राजकुमार केकाटे, कंधारपूर त्रैमासिकाच्या संपादिका रमाताई कठारे, भाजपचे तालुका सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपचे शहराध्यक्ष निलेश गौर, एमआयएमचे माजी तालुकाध्यक्ष शेख हब्बूभाई, रेड पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष राज मळगे, वाहन चालक मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर सोनकांबळे, बहाद्दरपुरा ग्रामपंचायतीचे सदस्य बालाजी तोटावाड, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बनसोडे, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप जोंधळे, जनता दल सेक्युलरचे महेमुदखाॅन पठाण, माधव भालेराव, सामाजिक कार्यकर्ते पिंटू कदम आदींसह विविध जयंती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व सण व उत्सव एकोप्याने साजरे करावेत. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही. याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. तरुणांनी डीजेमुक्त जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. देखाव्यातून इतर धर्मांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची खबरदारी घ्यावी. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन सण व उत्सव साजरे करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केले.