खासदार अधिकारातील विकास कामाचा काही हिस्सा फुलवळ साठी देणार – डॉ. काळगे

 

(कंधार : विश्वांभर बसवंते )

माझ्यावर विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी निवडून द्या, मी खासदार म्हणून निवडून आल्यावर माझ्या खासदारकीतील अधिकाराचा विकास कामासाठीचा काही वाटा फुलवळ गावच्या विकासासाठी नक्कीच देणार अशी भावना लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांनी फुलवळ येथे व्यक्त केले.

दि.७ एप्रिल २०२४ रोज रविवारी सकाळी ९:३० वाजता कंधार तालुक्यातील फुलवळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार डाॅ.शिवाजीराव काळगेसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते व कार्यकर्ता संपर्क दौरा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन नारायण जयवंतराव मंगनाळे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.

या संपर्क दौऱ्यात लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे, शिवसेना (उबाठा) चे महाराष्ट्र संघटक एकनाथ दादा पवार, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शामसुंदर शिंदे, काँग्रेसचे कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे, लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, शिवसेनेचे नेते ॲड. मुक्तेश्वर केशवराव धोंडगे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

या संपर्क दौरा कार्यक्रमात एकनाथ दादा पवार, सौ.आशाताई शामसुंदर शिंदे, संजय भोसीकर, उत्तम चव्हाण, विश्वांभर बसवंते यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता शेंबाळे यांनी केले, सूत्रसंचालन सतीश देवकते, तर उपस्थितचे आभार आनंदा पवार यांनी केले.
हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी चंदबसआप्पा मंगनाळे, मनोहर मंगनाळे, श्रीकांत मंगनाळे, अंकित मंगनाळे, राजू महाराज स्वामी फुलवळकर, वसंत मंगनाळे, शिवाजी सोमासे, नवनाथ बनसोडे ,परमेश्वर डांगे, दीपक फुलवळे, सचिन मंगनाळे, दीपक बसवंते, यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *