अफ्रीकन बाओबाब वृक्ष /मंकी ब्रेड ट्रि… सापडला कंधार तालुक्यात निसर्गाची करणी आफ्रिक बाओबाब या वृक्षराज कल्पवृक्षात हजारो लिटर पाणी!

 

 

कंधार : आपले मन्याड खोरे अनेक वैशिष्ट्यपूर्ण निसर्गांच्या वृक्षधनाने बहरले आहे.आपल्या येथील सीताफळ हे सुप्रसिद्ध फळ आहे.पण आज दि.०७ एप्रिल २०२४ रोजी मन्याड खोर्‍यातील वृक्षमित्र,आमचे मार्गदर्शक मित्र मा. शिवसांबजी घोडके यांना वृक्षांच्या शोध मोहिमेत हा दुर्मिळ कल्पवृक्ष त्यांच्या आभ्यासपूर्ण नजरेच्या दृष्टीक्षेपात आला त्यावेळी त्यांनी या दुर्मिळ अशा अफ्रीकन बाओबाब या वृक्षराजाचे दर्शन करता आले.एका वृक्षाच्या बुध्याचा घेर ४५\५० फुटाच्या वर आहे.तर दुसऱ्या विशाल वृक्षाच्या बुध्यांचा घेर ६५\७० फुटाचा भरतो.जगातील सर्वात विशालकाय वृक्षाच्या बुधा जवळपास १०० फुटाचा घेरा असतो.खोड स्पंजी असल्यामुळेच १२०००० इतके लिटर पाणी असते.हा वृक्ष जिथे आग लागते त्या क्षेत्रात आणि वाळवंटी प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात.कंधार व लोहा तालुक्यात हा वृक्षराज एकमेव आहे असे वाटते.अफ्रीकन, अरब व्दिपकल्प या भागाकडून आलेल्या प्रवासी मानवांनी आपल्या भारतात हा वृक्षराज आणला असावा.या कल्पवृक्षाची फळे चविने आंबट असल्यामुळेच ते माकडांना जास्त आवडतात.म्हणून त्या वृक्षास ” मंकी ब्रेड ट्रि “असेही ओळखले जाते.

जागतिक दर्जाचे फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञ मायकल अॅडन्सने आभ्यास केल्यामुळेच अॅडॅन्सोनिया असेही संबोधले जाते.या वृक्षाची ऊंची ५०\६० फुट असते.ते पानगळी या वर्गात मोडते आहे.८ महिने पर्णवारहित तर चार महिने पर्णासहित वृक्ष असतो.आपल्या मन्याड खोर्‍यात हा दुर्मिळ वृक्ष अनेक वर्षांपासून आहे.त्यांच्या अंतरसाली पासून ब्राउन पेपर तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.आमचे जिवलग वनाधिकारी शिवसांब घोडके यांनी मला या वृक्षाचे दर्शन करण्यासाठी खुप मेहनत घेतली.

अफ्रीकन बाओबाब वृक्ष /मंकी ब्रेड ट्रि...
अफ्रीकन बाओबाब वृक्ष /मंकी ब्रेड ट्रि…

 

रस्ता खराब असल्यामुळेच मला स्वतःच्या बाईकवर बसून मदतीलीला लाल होते.मन असेल खंबीर, शरीर साथ देते.या म्हणीची पुन्हा प्रचिती आली.
आज पर्यंत म्हणत होतो “देवाची करणी अनू नारळात पाणी!पण आज कळाले, की निसर्गाची करणी अन् अफ्रिकन बाओबाब कल्पवृक्षाच्या बुध्यात लाखो लिटर पाणी हा चमत्कार आहे.अशा वृक्षराजास भेटल्याने अविस्मरणीय वाटले!हा वृक्षराजाचे आयुर्वेदातील महत्त्व ठळक आहे.शिवसांबजी घोडगे यांचे ३५०० पानांचे एकूण ७ खंड विविध वनस्पतीची माहिती सचित्र ग्रंथ शासकीय प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

त्यांच्या मौल्यवान ग्रंथ प्रकाशनास लक्ष-लक्ष सदिच्छा व मानाची जयक्रांति!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

दत्तात्रय एमेकर कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *