या के पैरो में जन्नत होती हैं कंधार : येथून जवळच असलेल्या फुलवळ या मुळगावी मी आज गेलो होतो.याची दोन कारणे होती.एक म्हणजे रमजान ईद ची सुट्टी आणि दुसरं म्हणजे मायीला भेटणं.यापुर्वी मी शिमग्याच्या दिवशी सकाळी धावती भेट घेतली होती.आज दुपारी तीन वाजता गेलो तेंव्हा आमचा पुतण्या संतोषचे लेकरं ओसरीवर झोके खेळत होती ्अर्धा तासानं गावातील सासुबाई भागिरथी ना मंगनाळे घरी आल्या.दोन तास म्हणजे पाच वाजेपर्यंत मी मायीच्या सहवासात होतो.आज रमजान ईद.मुस्लिम धर्मात मा की पैरो में जन्नत होती हैं, असं म्हणतात.अशी. धारणा आहे.हे मला आठवताच मी जमीनीवर बसलेल्या माईची आणि खुर्चीवर बसलेल्या गावातील सासुबाईची एक फोटो काढला.आणी परतीच्या प्रवासाला लागलो.
छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे