SVEEP अंतर्गत लोहा तहसिल येथे सेल्फी पॉईंट चे उदघाटण

 

(लोहा : दिगांबर वाघमारे )

 

लोहा तहसील कार्यालयात दि. 11.04.2024 रोजी सायंकाळी SVEEP अंतर्गत सेल्फी पॉईंट चे मा. अरूणा संगेवार मॅडम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 41-लातूर लोकसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या हस्ते उदघाटण संपन्न झाले. त्यावेळी कंधार चे तहसीलदार मा. रामेश्वर गोरे साहेब व लोहा तहसीलदार मा. विठ्ठल परळीकर यांनी सेल्फी काढून आवाहन केले.

तसेच यावेळी नायब तहसीलदार रेखा चामणर, नायब तहसीलदार अनिल परळीकर, नायब तहसीलदार संजय भोसिकर, नायब तहसीलदार मोकले व तलाठी कदम, मोतीराम पवार,

 

परशुराम जाधव तलाठी, SVEEP प्रमुख वाघमारे एन एम, मन्मथ थोटे, राजेश गायंगी, सुरेश वंजे, कोतवाल शिल्पा ढवळे, शिक्षक गोपाळ किरपणे, तिरुपती मुंगरे, कोतवाल माधव काकडे शिपाई लघुळे इ उपस्थित होते.

 

 

 

तसेच दरम्यान आज जि प प्राथ शाळा उस्माननगर,जि प प्राथ शाळा शिराढोण,उस्मानगर आणि पांगरा ता कंधार येथे sveep अंतर्गत विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करण्यात आली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *