राम तरटे यांना पुण्याचा बंधुता शब्दक्रांती पुरस्कार प्रदान

 

 

नांदेड (प्रतिनिधी)- येथील पत्रकार, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार, आकाशवाणीचे निवेदक राम तरटे यांना पुणे येथील बंधुता लोकचळवळीला बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार काल दि. १२ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.
पुणे येथील नवीपेठमधील एस. एम. जोशी सभागृहात पार पडलेल्या पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 

डॉ. श्रीपाल सबनीस, पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती गोयल, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. विजय ताम्हणे, प्रा. सुभाष वारे, प्रसिद्ध कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, नंदा कोकाटे यांच्या हस्ते तरटे यांचा गौरव करण्यात आला. राम तरटे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य, संस्कृती, कलेसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *