Post Views: 201
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक: 14 एप्रिल 2024 रोजी. समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी श्री. सुनील महेंद्रकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी, मुकुंद मुळे, संजय पाटील, शिवाजी देशमुख, सोनू दरेगावकर, ओमशिवा चिंचोलकर, राजेश मेथेवाड, जोगिंदर बुक्तरे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.