कंधार : यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकसंवाद पत्रकारिता पुरस्कार कंधार तालुक्यातील ग्रामीण मधील लोकमतचे प्रतिनिधी गोविंदराव शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या या राज्यस्तरीय पुरस्कार बद्दल त्यांचे कौतुक व स्वागत होत आहे.
मागील पंधरा वर्षापासून कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील सतत लोकमतच्या माध्यमातून बारूळ व पेठवडज मंडळातील शेतकऱ्याचे रस्त्याचे वंचिताचे आरोग्य पाणी प्रश्न या विविध विषयावर त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाला सरकारला काही निर्णय सत्य परिस्थिती मांडून न्याय मिळवून दिला आहे त्यामध्ये प्रामुख्याने जून 2018 मध्ये बारूळ व उस्माननगर मंडळात ढगफुटी होऊन या दोन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पंचनामे ही झाले होते परंतु प्रशासनाकडून नुकसान ही पंचनामे करूनही निरंक दाखवल्यामुळे लोकमतच्या माध्यमातून गोविंदराव शिंदे यांनी हा मुद्दा सतत लावून धरून त्यामुळे निरंक दाखवलेले पुन्हा नुकसान झाल्याचे दाखवून दहा हजार 588 शेतकऱ्यांना न्याय मिळाला यासोबतच कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाला वेळोवेळी निदर्शनास आणून दिले ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा रोजगाराचे प्रश्न युवकाचे प्रश्न यासोबतच
प्रामुख्याने त्यांनी राज्य मार्ग कंधार बारूळ ते नरसी या रस्त्यासाठी सतत केलेल्या पाठपुरवठाला यश ग्रामीण भागातील समशान भूमी आरोग्य विषय वैद्यकीय अधिकारी कर्मचारी औषधेचा पाठपुरवठा विशेष म्हणजे त्यांनी मानार प्रकल्पातील होणारी पाण्याची गळती तसेच या प्रकल्पातून पर जिल्ह्यात जात असलेली पाणीपुरवठा या विविध प्रश्नावर त्यांनी प्रशासनाला लोकप्रतिनेला धारेवर धरले व काही प्रमाणात त्यांना या माध्यमातून शेतकरी रोजगार नागरिकांना वंचित न्याय मिळाला त्यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संस्थांच्या वतीने देण्याचे जाहीर करण्यात आले
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्यांना स्वागत अभिनंदन करण्यात येत आहे