मुखेड येथील नागेंद्र मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन संपन्न

मुखेड:(दादाराव आगलावे)

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे‘ अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी मुखेड येथील नागेंद्र मंदिर येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात नुकताच संपन्न झाला.
मुखेड येथील सेवेकऱ्याच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवा,आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) मुखेड केंद्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी स्वामी याग संपन्न झाला. आठच्या आरती नंतर मुखेड शहरातून स्वामींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. गुरु प्रणाली, ढोल ताशाच्या गजरात मुखेड नगर प्रदक्षिणा करून विविध देखाव्यासह साडेदहाच्या आरतीस सर्वसेवेकरी केंद्रात उपस्थित झाले.

महाआरतीनंतर गुरु प्रणालीची ओळख करून देण्यात आली.त्यात दत्त महाराज- शेखर हक्के,
श्रीपाद श्रीवल्लभ – देवेंद्र वदुलवाड, नरसिंह सरस्वती – शहाजी वडजे, श्री स्वामी समर्थ – श्रम वाकडे, पिठले महाराज – आरूषी पेडगुलवार, गुरु माउली – शर्वरी कवटिकवार, मोरे दादा – श्रावणी पेडगुलवार, भारत माता – सिद्धि वाकडे यांनी भूमिका साकारल्या. पारंपारिक वेशभूषा परिधान करून महिला व पुरुष ढोल वाजवणे हे मुख्य आकर्षण ठरले. असंख्य महिला व पुरुष सेवेकर्‍यांनी अथक परिश्रम केले. यात सेवेकऱ्यांचा मोठा सहभाग होता. श्री स्वामी समर्थ इ.स. 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला.

 

तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. 06/04/1856 हा होता. दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले. स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आशी. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस छेली खेडा नावचा गाव होता. त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंग खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला.

 

तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया. विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने त्या दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले ”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं” बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती. ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज. विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *