कंधार (ता.प्र)
नुकताच पवित्र असलेला रमजान महिना संपल्यानंतर दि.११ गुरुवार रोजी रमजान ईद – उल – फित्र कंधार सह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कंधार शहरात असलेल्या प्रसिद्ध व सर्व धर्माचे श्रद्धा असलेले सुफी संत हजरत हाजी संय्याह सरवरे मगदूम रहे.दर्गाहचे मुतवल्ली सय्यद मुजतबा मोहियोद्दीन हुसेनी व त्यांचे नातेवाईक सय्यद गौस मोहियोद्दीन शासकीय गुत्तेदार परभणी यांच्या वतीने कंधार तालुक्यातील सर्व धर्म ,सर्वपक्षीय कार्यकर्ते व पत्रकारांसह प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार करून अल्प उपहार व शीरखुर्मा कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.
दि १२ शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले जिल्ह्यातच नव्हे तर राज्यासह इतर राज्यातही प्रसिद्ध असलेले सुफी संत हजरत सरवरे मगदूम रह. दर्गाहचे मुतवल्ली सय्यद मुजतबा मोहियोद्दीन हुसेनी व त्यांचे नातेवाईक सय्यद गौस मोहियोद्दीन शासकीय गुप्तधन परभणी यांच्या वतीने कंधार तालुक्यातील सर्व धर्मीय सर्वपक्षाचे कार्यकर्ते नेते पत्रकार व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे स्नेह मिलन व्हावे यासाठी या अस्नेमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार शंकर ना धोंडगे शिवसेना नेते एकनाथ दादा पवार,ॲड मुक्तेश्वर धोंडगे, स्वप्निल पा.लुंगारे, गणेश कुंठेवार ,अरुण बोधनकर, संजय पाटील ढाले, चंद्रकांत आडगावकर,अंगद केंद्रे, मन्ना चौधरी, हमीद सुलेमान, जफरउल्ला खान, अजीम बबर मोहम्मद, सय्यद अहमद अली, शेख हबाबूभाई, एजाज पटेल, सय्यद अमजद, सय्यद यासर आली, आसिफ पटेल, यांच्यासह दर्ग्याचे खादिम व इतर मान्यवर या स्नेह मिलन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.