पहा किती प्रगती आहे बरं.. पुरूष मला आवडतात ..मी त्यांच्यावर खुप प्रेम करते पण त्यांच्या प्रेमाने हे हद्द पार करतात हे मात्र खरय.. आज खूप दिवसांनी पुरुष हृदय लिहायला तुम्ही भाग पाडलं..
दोन दिवसांपूर्वी मी माझ्या मित्राच्या बिझनेसची ॲड केली होती .. मी ते काम As a model म्हणुन केलं होतं आणि त्या व्हीडीओवर संपर्कासाठी माझ्या मित्राचा नंबर दिला होता.. जेव्हा एखादी ॲड येते तेव्हा त्यावर मॉडेलचा नंबर कसा असेल हा साधा विचार माझ्या विद्वान पुरूष मित्रांच्या डोक्यात यायलाच हवा होता.. दुसरं महत्वाचं म्हणजे , त्या व्हीडीओवर मित्राचं नाव आहे आणि तिसरी गोष्ट पुस्तकांसाठी 8605697161 हा नंबर सगळ्याना दिलेला आहे तरीही माझ्या मित्राच्या नंबरवर अनेक wp मेसेजेस आले आणि त्यात ज्या काही गमतीजमती घडत आहेत त्या वाचून आम्ही मनमुराद हसलोच त्यामुळे आता तुम्ही हसावं म्हणुन शेअर करतेय..
नंबर मिळाला की डायल करायचा ही आपली घाणेरडी सवय कधी जाईल माहीत नाही.. कारण नसताना wp / messenger वर मेसेज करणं आणि संत असल्याचा आव आणणं हे तर अजूनच लज्जास्पद.. माझ्या मित्राला मेसेज आले , You are sexy , you hv nice figure.. त्यावर तो म्हणाला , सोनल मी माझ्याच डोक्यावर हात फिरवला आणि लक्षात आलं , डोक्यावर चार केस नाहीत आणि कसला सेक्सी गं. यातला सकारात्मक भाग माझ्या मित्राला मी घ्यायला लावला , त्याला म्हटलं , या जन्मात तुला कोणी सेक्सी म्हणणार नाही .. तु एंजॉय करुन घे आणि सचिन ला सुध्दा Mam love you.. miss you.. yu hv nice boobs असे मेसेजेस गेली अनेक वर्षे येतात तेव्हा त्या पुरुषाला काय वाटत असेल याचा विचार कर आणि आनंद घे..
या जगात फक्त आनंदच आहे.. दुख आहे कुठे ??.. मी तरी कधी पाहिलं नाही.. माझ्या पुरूष मित्रांनो, हेल्दी फ्लर्टींग करा अस मी नेहमी म्हणते , पण मित्राला सेक्सी म्हणणं जरा जास्तच झालं नाही का.. सचिन मला नेहमी म्हणतो , एखाद्या पुरुषाची बायको सेलीब्रीटी असते तेव्हा तो पुरुष सेलीब्रीटी होतो इथपर्यंत ठिक आहे पण एखाद्या पुरुषाची बायको हॉट आहे तर तिचा नवरा हॉट म्हणजे……….. कल्पना पण नको रे..
आमच्या घरात असे रोज किस्से वाचायला मिळतात आणि आम्ही रोज हसत असतो आता माझे मित्रही त्यात.. मित्र म्हणाला , इतक्या पुरुषांनी बिझनेससाठी सुध्दा कधी मेसेजेस आणि फोन केले नाहीत आणि मी सुंदर आहे हे तर कोणीच म्हटलं नाही.. तुमच्या प्रेमामुळे कदाचित त्याच्याही डोक्यावर केस यायला लागतील.. हाहाहा.. दोन दिवसांपूर्वी मेसेंजरवर मला मेसेज होता , सोनल मॅम , माझी प्रोडक्ट तुमच्या वॉलवर ठेवा , आमची कंपनी तुम्हाला पे करेल..
अशी कुठली कंपनी आहे जी डॉक्युमेंट न करता पेमेंट करते आणि फोन करा असं म्हटल्यावर , मी कामावर आहे असा मेसेज आला.. सोशल मिडीयावर राहून रिकामटेकडे उद्योग दुसरं काय.. आपण कोणाशी बोलतो , काय बोलतो याचं भान असणं हीच सभ्यता आहे..
मॅडम आमच्या प्रोडक्टची ॲड कराल का ??.. मी म्हटलं कसली प्रोडक्ट आहेत ??.त्यावर त्यांचा मेसेज आला ,” बनीयन ” त्यांना ब्रा म्हणायचं होतं आणि चुकून बनीअन म्हटलं का ??.. असा प्रश्न मनात येवुन गेला आणि विचार केला की या दोन्हीत जेंडरचा फरक आहे आणि तरीही त्याने असा शब्द का वापरावा ??.. हसा रे मनसोक्त हसा पण उद्योग करणं सोडु नका नाहीतर पुरूष हृदय मी लिहीणार कसं ??..
हा लेख मित्राला समर्पित कारण त्यानेच लिहायला सांगितलं..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi