मले मतदानाला जायाचे हाई…!  पथनाट्याद्वारे चिमुकल्यांची मतदान जनजागृती

 
 
नांदेड – गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात
  स्वीप द्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. नांदेड लोकसभा मतदारसंघात उद्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळा देशमुख मतदान केंद्रांतर्गत शालेय मतदान जनजागृती मंचाच्या वतीने ‘मले मतदानाला जायाचे हाई!’ हे पथनाट्य सादर करुन मतदारांना आकर्षित केले.
यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार यांच्यासह मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे,  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष चांदू झिंझाडे, मारोती चक्रधर, आनंदा गोडबोले, हैदर शेख, मनिषा गच्चे, माधवदादा गोडबोले, पांडुरंग गच्चे, इंदिरा पांचाळ, हरिदास पांचाळ, तुकाराम गोडबोले, किशन गोडबोले, सुलक्षणा गच्चे आदींची उपस्थिती होती.
 
             केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात आली होती. यानुसार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबविले. यात पत्रलेखन, मतदानाची शपथ, घरोघरी मतदानाचा संकल्प, रंगभरण चित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता.
गावातील चौकाचौकात पथनाट्याचे सादरीकरण करुन मतदान करण्याचे चिमुकल्यांनी आवाहन केले. या उपक्रमास गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षणविस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, केंद्रप्रमुख नागोराव जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे यांच्यासह सरपंच माधव पावडे माजी सरपंच साहेबराव शिखरे कैलास गोडबोले आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *