12 व्या शतकातील महान समाज सुधारक, लिंगायत धर्माचे संस्थापक यांची 1200 वी जयंती छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर नी योगा मैदानावर सकाळी 7:00 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
प्रथमता छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य व्ही एस पडिले, अशोक चापटे, आणि धोंडीराम इर्लापल्ले यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.डी एस वाघमारे, मराठा सेवा संघाचे अशोक चापटे, माधव तिगोटे, बालाजी दुगाने एन डी राठोड यांनी महात्मा बसवेश्वरांच्या एकूणच कार्याबद्दल उपस्थित यांना माहिती दिली.
श्री माधव तिगोटे यांनी सांगितले की महात्मा बसवेश्वर यांचे जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावांमध्ये 1111 मध्ये झाले. महात्मा बसेश्वर यांनी समाजातील अनेक वाईट चाली रुढी परंपरा ह्या बंद करण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न केले. हिंदू धर्मामध्ये त्यांच्या विचारांना वाव मिळत नाही म्हणून त्यांनी 12 व्या शतकामध्ये स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली आणि त्याद्वारे त्यांनी आयुष्यभर समाज सुधारणाची कार्य केली.
याप्रसंगी श्री गणेश वाघमारे,हिरामण धसवाडीकर , गौतम वाघमारे एल डी कांबळे, विनोद नामपल्ले, विक्रम सिंह कचवे यांनी महात्मा बसेश्वर यांना विनम्र अभिवादन केले. जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन गौतम वाघमारे यांनी केले तर आभार बालाजी दुगाने यांनी मांडले.