मुखेड: इंग्लिश मीडियम असोसिएशन नांदेड (AEMS) यांच्या वतीने नांदेड जिल्हातील दहा शाळेस विद्या रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कारासाठी जिल्हातील अनेक शाळेने प्रस्ताव दाखल केले होते. विद्यारत्न पुरस्कारासाठी मुखेड येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची निवड करण्यात आली.
गेल्या २५ वर्षापासून प्रा. डॉ. संजीव डोईबळे यांच्या प्रमुख पुढाकारातून मुखेड येथे पहिली इंग्लिश स्कूल सुरू केली व इंग्रजीचा पायाभरणा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत मेहनतीतून त्यांनी सर्वांगीण विकास ,संस्कार राष्ट्रभक्ती साठी कार्य करीत असल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. सदरील पुरस्कार शाळेच्या संचालिका सौ. राजश्री संजीव डोईबळे याना, एम्सचे अध्यक्ष श्री केशव गड्डम, सचिव श्री जितेंद्रसिंह पहाडिया, प्राचार्य डॉ. हरिबाबू , सुनील राठोड, संजय बजाज, गोविंद बजाज, जे. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
मागील तीन तपापासून मुखेड व परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण तसेच स्पर्धेच्या युगात मुले गुणवत्ता धारक होण्यासाठी त्यांचे प्राथमिक शिक्षणचा पाया मजबुत असला पाहिजे त्या दिशेने शाळेची वाटचाल चालू आहे व यापुढेही तसाच दर्जा टिकून राहील असे आश्वासन प्रमुख विश्वस्त प्रा. संजीव डोईबळे यांनी दिले. या यशाबद्दल शाळेचे संचालक मंगेश कोडगिरे, विलास कोडगिरे, डॉ. संजय वावधाने, डॉ. शंकर मुगावे, श्रीकांत हिरेमठ, प्राचार्य मुखेडकर व सर्व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.