अनेकदा तो वेगवेगळ्या रुपात आपल्याला भेटत असतो पण आपण त्याला ओळखायला कमी पडतो हा आपला कमकुवतपणा आहे ..माझ्या बाबतीत तर अनेकदा तो मित्रांच्या रुपात माझ्या सोबत असतो आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.. इतकं सहज कोणाला भगवंत भेटतो का ??.. आपली श्रध्दा असेल आणि आपण खरे असु , प्रामाणिक असु तर प्रत्येक क्षणी तो जवळ असतो..
कालचा एक किस्सा शेअर करत आहे.. दिवसभर माझी दाढ दुखत होती.. मी शक्यतो पेनकिलर किवा कुठलही मेडीसीन घेत नाही.. दुखत असताना दिवसभर कामात राहिले ..
माझ्या डेंटीस्ट मित्राला फोन केला.. आणि संध्याकाळी एफसी रोडवर मला काही कामानिमित्त जायचे होते.. दाढ दुखत होतीच पण त्याकडे दुर्लक्ष करुन मी पुन्हा माझ्या कामात राहिले.. कदाचित भगवंताच्या ही गोष्ट लक्षात आली असावी.. त्याने माझ्या मित्राला एफ्सी रोडवर पाठवलं.. तिथुन आम्ही घोले रोडवरच्या नॅचरल्स ला गेलो.. तिथे मलाई आईस्क्रीम विथ मॅंगो असं सुंदर आईस्क्रीम खाल्लं.. हापूसच्या ताज्या फोडी , सोबत काळजी घेणारा मित्र आणि नॅचरल्स ला लागुन टी पोस्ट कॅफे आहे तिथून सुमधुर संगीत आणि गिटार ऐकु येत होती.. ती संध्याकाळ मंत्रमुग्ध करणारी होतीच पण माझं दुखणं मी विसरुन जावं म्हणुन भगवंताने दिलेली ही मला ट्रीट होती.. आम्ही आईस्क्रीम खाऊन पलीकडे टी पोस्ट ला जाऊन बसलो ..
२५ शीतील गायक आणि सोबत यंग क्राउड मनमुराद संगीताचा नजराणा ब्रह्मांडात सोडत होते आणि ती संध्याकाळ रोमॅन्टिक करत होते… आम्ही दोघे इतके त्यात रमलो कि माझी दाढदुखी विसरुन गेले .. मला आनंदी ठेवण्यासाठी भगवंताने माझ्या नित्राला ( मिलिंद ) पाठवलं .. मित्रही उत्तम गायक आहे.. त्याने एक गाणं गायलं .. त्यानंतर तिथे एक यंग कपल होतं.. जे मॅरीड नव्हते पण प्रेम तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वहात होतं .. जेव्हा त्याने तिच्यासाठी गाणं गायलं आणि एक डायलॉग म्हटला तेव्हा तिला लाजताना पाहून माझ्या शरीरात चांगले हॉर्मोन्स सिक्रेट झाले असावेत .. त्याचवेळी माझ्यातील रोमॅन्टिक लेखिका , प्रेयसी , बायको , आई सगळ्या जाग्या झाल्या आणि त्या मुलीच्या गालावरील लाली पाहून I was also blushing .. मी तरुण झाले.. त्या मुलांचे खर्ज्यात जाणारे आवाज ऐकुन चकीत झाले आणि वरचा सा लागताना अंगावर रोमांच उभे राहिले..
जेव्हा कैलाश खेरचे गाणे त्या मुलाने सुरु केले तेव्हा मी पुन्हा माझ्याच प्रेमात पडले.. तुमने क्या कर डाला.. मीट गयी मै .. मर गयी मै . हाहाजी ओहोजी.. दिवानी…. अहाहा सगळीच कमाल.. अरे हे शब्द तो भाव येतो कुठून ??.. गिटारच्या तारेत शब्द फिरतात कसे ??.. गायक खर्जा ते वरचा सा या सात स्वरात गातो कसा ??. सगळेच प्रश्न निरुत्तरीत .. जिथे उत्तर सापडत नाही तिथे भगवंत हेच एक उत्तर आहे.. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या परवानगीशिवाय झाडाचं पानही हलु शकत नाही पण त्याच्यासाठीच जेव्हा सगळं करतो तेव्हा तो प्रत्येक गोष्ट देतो.. रात्री घरी आल्यावर माझा डेंटीस्ट मित्र केतन चा फोन आला.. सोनल पेन किलर देउ का गं.. त्याला म्हटलं , मी एकदम ओके आहे कारण भगवंत मित्र रुपात डॉक्टर होवुन आला आणि संगीताच्या रुपात पेन किलर देउन गेला त्यानंतर मी मनोमन सुखावले..
फक्त प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी करा आणि आनंद घ्या..
हरे कृष्ण.. हरे कृष्ण.. कृष्ण कृष्ण हरे हरे.
हरे राम हरे राम .. राम राम हरे हरे
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi