यंदाची लोकसभा निवडणूक आठवणीत राहण्याजोगी.. सामान्य मतदारांबरोबरच राजकीय पक्ष आणि विशेष करून प्रत्यक्ष रणांगणात असलेल्या राजकारण्यांसाठी ही निवडणूक नक्कीच अविस्मरणीय ठरणार..!

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या लोकसभेची निवडणूक व प्रचाराची रणधुमाळी ही राजकीय पक्ष , राजकिय नेतेमंडळी बरोबरच सर्वसामान्य माणसाच्या आठवणीत राहण्याजोगी असणार आहे. याच मूळ कारण म्हणजे सरकारच्या कार्यप्रणालीवर सर्वसामान्य माणसांचा जनआक्रोश , महागाई व बेरोजगारीप्रति जन माणसांतून तिव्र नाराजी तसेच महाराष्ट्र राज्यात गेले अनेक दिवसांपासून घडलेले फोडाफोडीचे राजकारण , तसेच राज्यात चालू असलेला मराठा आरक्षण चा जिव्हाळ्याचा मुद्दा होय..

होऊ घातलेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बड्या बड्या नेत्यांच्या सभा , भेटीगाठी नंतर आता येथील प्रचार अंतिम टप्प्यात आला असला तरी लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. ठिकठिकाणी बैठका , भेटीगाठीमुळे निवडणूकीचे रणांगण चर्चेत आले आहे.

प्रचारादरम्यान किंवा गाठीभेटी दरम्यान एक पक्ष दुसऱ्या पक्षाची बाजू कमकुवत दाखवत आपणच किती श्रेष्ठ आहोत हे पटवून देण्यात मग्न आहेत. काहीजण म्हणताहेत की मागच्या सत्तर वर्षाच्या काळात जे झाले नाही ते आम्ही करून दाखवले. सत्तर वर्ष सत्ता असूनही त्यांच्याकडून जनतेच्या व देशाच्या विकासाची कामे करणे झाली नाहीत ते आता यापुढे तरी काय करणार..? तर दुसरीकडे विरोधक म्हणताहेत की सत्तर वर्षाचा कार्यकाळ आणि ते सरकार हे जणसामान्य माणसाचे होते , परंतु मागच्या दहा वर्षाच्या कारकीर्दीतले सरकार हे केवळ जुमलेबाज असून दडपशाही करणारे , बेरोजगारी ला खतपाणी घालणारे जसे की नाव मोठे आणि लक्षण खोटे असेच हे सरकार आहे. तेंव्हा मतदारांनी यावेळी विचारपूर्वक निर्धार करूनच मतदान करावे , जेणेकरून पुन्हा एकदा पश्चातापाची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्लाही मतदारांना दिला जातो आहे.

परंतु सामान्य जनता व मतदार राजा आता भोळाभाबडा राहिला नसून आजपर्यंत च्या निवडणूका पहिल्या तर पक्ष कोणताही असो परंतु निवडणूकीचा काळ आला की त्या त्या पक्षाबरोबर च त्या त्या नेत्या अगोदरच कार्यकर्ते अति उत्साहाने निवडणुकीचे रणांगण गाजवत नेत्या अगोदरच आपणच घराबाहेर पडून प्रत्यक्ष प्रचाराला जात असत परंतु यावेळी मात्र चक्क याउलट चित्र पहावयास मिळत आहे.

 

आता कार्यकर्त्यांचा उत्साह अत्यल्प झाल्यामुळे नेतेमंडळी ची चांगलीच भंबेरी उडाली असून अनेक ठिकाणी तर नेत्यांना गावागावात प्रचार करणेही अत्यंत जिकरीचे होऊन चांगलीच दमछाक व तारांबळ उडाली असल्याने भल्याभल्यांना घाम फोडणारी ही निवडणूक ठरल्याचे बोलले जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *