डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा: सोनू दरेगावकर…

 

नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त, आयोजित कार्यक्रमात युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्षानुवर्षी जयंती साजरी करत असताना आपल्याला खरंच डॉ. बाबासाहेब समजायला का वेळ लागत आहे ? जर का डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्यांचे विचार आत्मसात करावे लागेल. तरच बाबासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि बाबासाहेबांना जी शासनकर्ती जमात हवी होती. ती आपण निर्माण करू शकतो.

आज समाजामध्ये नवयुवकांचा शिक्षणाचा दर्जा कमी होताना दिसत आहे आजचा तरुण हा व्यसनाधीन झाला असून जर का तरुण व्यसनापासून दूर राहिला तर तीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरू शकते. आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत होईल असेही दरेगावकर म्हणाले,

 

यावेळी नव्याने पोलीस उपनिरीक्षक झालेले रवी गादेकर यांचा जयंती मंडळाच्या वतीने, सन्मान करण्यात आला. याप्रसंगी, पी. बी. वाघमारे कोलंबीकर, उत्तमराव गवाले, मुरलीधर कांबळे यांचे मनोगत झाले. जयंती मंडळाचे अध्यक्ष, सिद्धोधन लांडगे, शिवाजी लांडगे, अमोल लांडगे, राहुल एडके यांच्यासह जयंती मंडळांचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लांडगे यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *