काल दापोलीहुन येताना आम्ही माणगाव ला थांबलो आणि एसी तुन बाहेर आलो तर बाहेर पहावत नव्हतं.. प्रचंड गरम झळा अंगावर येत होत्या .. मला वाटलं एसी तुन बाहेर आल्यामुळे असेल पण पुण्यातही तीच परिस्थिती .. बोलता बोलता माझा मित्र म्हणाला , कसं व्हायचं काय माहीत ??.. त्यावर मी म्हटलं , ही आपल्याच कर्माची फळं आहेत जी फक्त आणि फक्त आपल्याच भोगावी लागणार आहे पण जी मंडळी यात सामील नसतात तीही यात भरडली जातात
.. सुक्यासोबत ओलही जळतं म्हणतात ते असं..
पुण्यात प्रचंड प्रमाणात टॉवर उभे रहात असताना ज्या बिल्डींगला फक्त २० /२२ वर्षे झाली आहेत तेही ३० वर्षाने रीडीव्हलपमेंट करावी हा नियम मोडत आहेत .. हा नियम मोडत असताना फक्त १०० स्केअर फीट जागेसाठी निसर्गाची आपण किती हानी करतोय हे लक्षात येत नाही कि स्वार्थासाठी आपण त्याकडे डोळेझाक करतो ??.. याची शिक्षा तर मिळणारच कारण निसर्ग कोपला की काय होतं हे कोरोनाने दाखवून दिलय..
त्याला निमित्त चायना होतं मग याला निमित्त कोण असेल याचा विचार प्रत्येकाने जरुर करावा.. कोण तरी एक व्यक्ती त्याच्या स्वार्थापोटी सगळ्याना वेठीला धरते आणि इतर मंडळी निसर्गाचा विचार न करता नंदीबैलासारखी मान डोलावतात.. ३० वर्षाच्या आधी रीडेव्हलपमेंट केल्याने fsI चे बेनीफीट्स मिळत नाहीत आणि टॉवर आल्यावर मेंटेनन्स ४ पट आणि टॅक्स १० पट होतो त्याशिवाय फ्लॅट संख्या वाढल्यावर गर्दी आहेच.. गाड्या वाढणार. परिणामी प्रदूषण होणार.. लिफ्ट आली.. वॉचमन आला.. लाईट बील वाढणार.. या केसमधे रस्ते वाढणार का ??.. धरणं वाढणार का ?? .. या सगळ्याचं उत्तर कोण देणार.. नियमांनुसार ३० वर्षाने करावे लागेल त्यावेळी त्याचा विचार होवूच शकतो..
भगवंताने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवुन त्यालाच हानी पोचवायची आणि मग रडत बसायचं.. निदान इतर सभासदांनी तोंड उघडून आपली मतं मांडा नाहीतर निसर्गाचा रोष ओढवुन घ्यायला तयार रहा..
मुलं बाहेर गेली की दोनच माणसं घरात रहातात त्यांना अशी किती जागा लागते .. सगळ्यात आधी विचार निसर्गाचा व्हायला हवा तो न करता फक्त आपल्या हव्यासापोटी माणसं बेफीकीर वागताना दिसतात आणि सिमेंटचे रस्ते आणि टॉवर म्हणजे उभ्या चाळी यांना महत्व देतात.. माझा फ्लॅट ३ Bhk आहे सांगताना आपण खूप ग्रेट आहोत असं त्यांना वाटतं पण फ्लॅट मधे पाऊल ठेवलं की १०० पावलात फ्लॅट संपतो .. रीडेव्हलपमेंट नंतर तर याहूनही लहान खोल्या मिळतील कारण कारपेट आणि बिल्टअप एरीया ही सर्वसामान्य माणसाला न कळणारी गणितं बिल्डर आणि मध्यस्ती मोठ्या हुशारीने आपल्या डोक्यात घुसवतात आणि आपण अडाणी होवुन पुन्हा माना डोलावतो..
स्वार्थ बाजूला ठेवुन फक्त एकदा भगवंताचा विचार करा कारण आपल्याला काय हवय हे त्याला माहीत आहे आणि त्यानुसार तो सगळं देतो मग ही घाई का ??.. सोसायटी असेल तर ५१% लोक हो म्हणाले तरी रीडेव्हलपमेंट होवु शकते पण अपार्टमेंटला १००% होकार लागतो असे अनेक नियम असताना डोकं गहाण ठेवुन वागणं म्हणजे आपत्तीला जवळ करणं आहे.. बेंगलोर मधे पाणी नाही असं जाहीर झाल्यावर तिथल्या रहीवाशांच्या डोळ्यात पाणी आलं त्यामुळे पुणेकरानो सावध व्हा .. नाहीतर एक दिवस आपल्याही डोळ्यात पाणी असेल..
हरे कृष्ण.. हरे कृष्ण.. कृष्ण कृष्ण हरे हरे.. हरे राम हरे राम राम राम हरे हरे..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi