मुखेडात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ

 

मुखेड:( दादाराव आगलावे)
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेड येथे गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजिला आहे.

या सप्ताह काळात अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड स्वामी चरित्र, गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पुण्यतिथीच्या दिवशी महानैवेद्य व महाआरती नंतर आयोजित महाप्रसाद वाटप करण्यात येतो.

पंचक्रोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. सप्ताह दि. 30 एप्रिल रोज मंगळवारी सुरुवात झाले असून दि. 6 जून रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे. गुरुचरित्र पारायणला असंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अतिउच्च कोटीची प्रहर सेवेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदविला आहे करोडो लोकांना प्रहर सेवेचे अप्रतिम अनुभव आले आहेत,

प्रत्येकाने प्रहर सेवा करावीच पण त्यासोबत कमीत कमी ५ तरी नवी व्यक्तींना आपल्यासोबत प्रहर सेवेला नक्की घेऊन जावे असा अनुभव देखील केंद्रात सांगितला जातो.
स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण व इतर सेवा शिस्तीमध्ये करून सहकार्य करावे असे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेडच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *