मन्याड खोऱ्यातील विकासाचे महामेरू काँग्रेसचे जेष्ठ नेते कर्मवीर गणपतराव मोरे

कर्मवीर गणपतराव मोरे यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्त

 साधारणपणे कर्मवीर गणपतराव मोरे यांचा जन्म पानशेवडी ता कंधार येथे सन 1928 च्या दरम्यान झाला प्राथमिक शिक्षण आंबूलगा येथे झाले. शिक्षण चालू असतानाच लहानपणी वडिलांचे छत्र हरवले त्यांना नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक अँड रामदासराव कोळनूरकर यांनी त्यांचे पालकत्व स्विकारले व राजकिय सामाजिक जीवनातील ते पहिले गुरू झाले त्यानंतर  त्यांना लहान पणापासून सामाजिक कार्याची आवड  निर्माण झाली .

गऊळ ता कंधार येथून आंबूलगा येथे इयत्ता 4 उर्दू चे शिक्षण पूर्ण केले व *येथीलच प्रतिष्ठित नागरिक यशवंतराव पाटील तेलंग यांची जेष्ठ कन्या सौ पद्मिनबाई यांच्याशी त्यांचा विवाहसाधारणपणे सन1948 ते 49 दरम्यान विवाह झाला* ते पानशेवडी येथे आपल्या कुटुंबासह राहत असत 1952 ला ते गावचे प्रथम सरपंच झाले आणि तेथून त्यांची राजकिय वाटचाल सुरू झाली  .   

  गणपतराव मोरे गावचे सरपंच असताना संत गाडगेबाबा यांना सर्वप्रथम आपल्या गावात आणून 7 दिवस स्वच्छतेवर त्यांनी साप्ताह आयोजित केला होता सतत 10 वर्ष सरपंच पदावर असताना जिल्हा परिषदेची ग्रामीण भागातील स्वतंत्र नळ योजना सर्वप्रथम पानशेवडी येथे सुरू केली.   

.

      ते जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती होते दरम्यान त्यांनी कुरुळा जिल्हा परिषद सर्कल मध्ये रस्त्याचे जाळे विणले त्यात प्रामुख्याने कंधार पानशेवडी उमरगा वांजरवाडा रस्ता, कुरुळा अहमदपूर रस्ता, कुरुळा दिग्रस रस्ता, कुरुळा गुंटूर रस्ता या सह परिसरात आपल्या दूर दृष्टीने या दळणवळणाचे साधन निर्माण केले व याच भागात सर्वप्रथम विज उपलब्ध करून देऊन कुरुळा सर्कल झळाळून सोडले ते अनेक काळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहिले व महाराष्ट्र खादी ग्राम उद्योग चे सचिव राहिले कंधार येथील खरेदी विक्री संघाचे संस्थापक चेअरमन या पदावर ही त्यांनी अनेक वर्षे कामे केली , मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सदस्य म्हणून ही काम पाहिले, जिल्हा सहकारी बोर्डाचे सदस्य, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे पहिले सचिव म्हणूनही त्यांनी काम केले अश्या विविध विभागात भरीव कामगिरी कर्मवीर गणपतराव मोरे यांनी केली  .

        कुरुळा सर्कल साठी पाणी टंचाई निर्माण झाली असताना हाळी ता उदगीर येथील तलावातून 55 गावची नळ योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली, कुरुळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले दिग्रस बु येथे एक दवाखाना निर्माण केला .तालुक्यातील सावरगाव नि येथे 2 , पेठवडज येथे 1, पानशेवडी येथे 2, शेल्लाळी, दिग्रस ,घागरदरा, हाडोळी ब्र उमरगा खोजन, मरशिवणी, पोखर्णी, दैठणा, बोळका महालिंगी , वहाद, मोहिजा परांडा , कारतळा, रामा नाईक तांडा, नागलगाव, जयराम तांडा, श्रीगणवाडी, या सह कंधार  तालुक्यातील अनेक गावांत तलाव मंजूर करून त्यापैकी बरेच तलाव त्यांच्या काळात पूर्ण केले स्वर्गीय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना *कर्मवीर गणपतराव मोरे बिमार होते त्यावेळी स्वतः शंकरराव चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती कुसुमताई भेटायला आले असता गणपतराव मोरे यांना अगोदरच भेटायला येणार हा निरोप दिला होता .

त्यामुळे गणपतराव मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अगोदरच दवाखान्यात बोलावून घेतलं होतं हे शंकरराव चव्हाण यांना माहीत नव्हते ज्या वेळी मुख्यमंत्री साहेब भेटायला आले त्यांनी कर्मवीर गणपतराव मोरे यांच्या तब्येतीची चौकशी केली त्यावेळी त्यांनी कंधार गऊळ दिग्रस जांब त्या रस्त्याला राज्य महामार्गाची मंजुरी द्या साहेब अशी विनंती केली असता मुख्यमंत्री साहेबांनी मी संबंधित विभागाला सूचना देतो असे म्हणाले तेव्हा साहेब सर्व अधिकारी येथे उपस्थित आहेत असे सांगल्या नंतर काय गणपतराव तुम्ही बिमार असताना सुद्धा भागाच्या विकासासाठी किती ही तळमळ करता म्हणाले आणि मी नाही केलो तर तुम्ही पुन्हा मुंबईला येता आणि काम करून घेता म्हणून त्यांनी लगेच त्या संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन सदर रस्ता हा राज्य महामार्गात बदल करून मजबूत डांबरीकरण केले* 

     शेकापूर येथे मराठवाड्यातील पहिला रेशीम उद्योग मंजूर करून घेतला त्याचे कामही काही प्रमाणात सुरू झाले होते याच दरम्यान पेठवडज व नंदनशिवणी येथील तलावाचे नुकसान झाले होते ते व शेकापूर येथील रेशीम उद्योगांचे काम पाहण्यासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व मंत्री आदिक यांना 12 सप्टेंबर 1983 निमंत्रण देऊन यांचा दौरा निश्चित करून परत येत असताना यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे द्वितीय चिरंजीव बालाजी मोरे व वकिलीचे शिक्षण घेणारे त्यांचे लहाने चिरंजीव तानाजी मोरे व वाहन चालक होते.

त्यांची जीप जिंतूर येथे आली असता *13 सप्टेंबर 1983 रोजी त्याच्या जीपला अपघात झाला अपघात इतका भीषण होता की कर्मवीर गणपतराव मोरे व  छोटे चिरंजीव तानाजी हे जागीच गत प्राण झाले* व बालाजी मोरे घायाळ झाले विकासाचे वेड असणारा विकासपुरुष, दिन दलितांचा कैवारी आपल्यातुन चटका लावून निघून गेला अशा महान विभूतीस माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली *

मामा तुम्ही व तुमचे  कार्य सदैव आमच्या स्मरणात राहील.*.


       *ज्ञानेश्वर पंडीतराव तेलंग*

yugsakshi live

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *