सातारा ;
भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय सातारा यांचे वतीने व्हर्च्युअल सर्वधर्मिय प्रार्थना सभेचे आयोजन झुम अँपवर करण्यात आले होते. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच कोरोना आपत्ती काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रध्दांजली देण्यासाठी ही सर्वधर्मिय प्रार्थना सभा रविवार दि.१३/०९/ २०२० रोजी सकाळी ८:०० वाजता संपन्न झाली.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्याची स्काऊट-गाईड चळवळी बद्दल विशेष आस्था होती.स्काऊट-गाईड विषयातून स्वावलंबी ,राष्ट्रप्रेमी , सामाजिक संवेदनशिल व उच्चतर नागरिकत् वाचे गुण असणारी पिढी निर्माण होईल यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना चळवळीच्या तर्फे अभिवादन करणे या प्रार्थना सभेचा उद्देश होता.
कोरोना काळात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या डॉक्टर,नर्स ,पोलिस , आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सभेस गटशिक्षणाधिकारी पं.स. कराड श्रीमती. शबनम मुजावर,सहा. राज्य संघटन आयुक्त स्काऊट श्री. अरुण सपताळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. स्काऊट-गाईड पद्धतीनुसार सर्वधर्मिय प्रार्थने मध्ये -प्रातःस्मरण , सरस्वती वंदन , गुरु महिमा ,रामधुन,नामधुन , सर्वधर्माच्या प्रार्थना , वुई शॉल ओव्हर कम , हर देश मे तू , शांती पाठ या प्रार्थना चे गायन करण्यात आले. व्हर्च्युअल सर्व धर्मिय प्रार्थना सभा जिल्ह्यात प्रथमतः स्काऊट-गाईड संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे .या व्हर्च्युअल प्रार्थना सभेस जिल्ह्यातील शाळांचे स्काऊट-गाईड युनिट अधिकारी शिक्षक / शिक्षिका , स्काऊट-गाईड विद्यार्थी मोठ्या संख्येने झुम मिटींगद्वारा उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा चिटणीस सौ. वनिता बाबर, सहचिटणीस श्री. सुभाष कुंभार , लिडर ट्रेनर सौ. कुसूम लोंढे, लिडर ट्रेनर श्री. प्रताप माने ,सौ. कांचन कोळी,श्री. सुरेश चव्हाण,श्री. मनोहर काटकर,श्री.प्रसाद गायकवाड ,श्रीमती. सुवर्णा साळवी , श्रीमती. सुनिता केदार , जिल्हा संघटक गाईड श्रीमती. कविता चौगुले यांनी ह्या सर्व प्रार्थनाचे गायन केल.
सदर प्रार्थना सभेच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी (माध्य) तथा जिल्हा मुख्य आयुक्त श्री राजेश क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघटक श्री. गजानन गायकवाड यांनी सभेचे संचालन केले.