काल संध्याकाळी माझ्या मित्राचा फोन आला होता.. जवळपास ३/४ महिन्याने त्याने फोन केला.. फोन उचलल्याबरोबर मी त्याला म्हटलं , कुठे गायब असतोस रे ??.. आणि मधेच धूमकेतूसारखा येतोस.. त्यावर तो म्हणाला ,तुझी खुप आठवण येते गं .. गेल्याच आठवड्यात conrad ला गेलो होतो तिथे टोफु खाताना तुझी आठवण आली होती.. पण मला माहित आहे तुला अनेक मित्र असल्याने तुला माझी आठवण येत नसावी..
माझा स्वभाव हा खट्याळ आणि मिश्किल असल्याने मी त्याला म्हटलं , अरे कालच मिस यु असा मेसेज केला होता आणि ब्रॉडकास्ट ला शेअर केलेला, मिळाला नाही का तुला ??.. किती बदमाश आहेस गं तु ??असं तो म्हणाला आणि दोघेही वेड्यासारखे हसत सुटलो.. माझी ही चेष्टा नेहमीची आहे हे सगळ्याना माहीत आहे पण आज सकाळी खरा खुरा मिस यु असा मेसेज केल्यावर त्याचा रीप्लाय आला ,काय गं आताही send it to all का ??.. हेहेहे.. काय करावं बरं ??.. माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही यार.. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते यावर एक मी रिल केले होते . त्यावर अनेकांचे रीप्लाय होते .. आलोच खरं तर तेही send it to all होतं रे.. कायम मी मज्जा घेत असते आणि आनंद देत असते.. लोक सीरीयस होतात त्याला मी काय करु ??
आपण यातील गमतीचा भाग सोडुन देउ पण खरच अशाही कितीतरी घटना घडत असतील ना ??.. माझ्या मित्राची खरी खरी घटना सांगते .. त्यातून काय धडा घ्यायचा हे माझ्या वाचकांनी ठरवावं.. तो सिहगड रोडवर रहातो.. जवळपास १३ वर्षापासून तो रीलेशनशिपमधे होता .. असच एक दिवस एका गृपमधे त्याची ओळख एका सिंगर लेडीशी झाली .. काय झालं माहीत नाही , साहेब तिच्याही प्रेमात पडले .. जवळपास ६ महिने दोन्हीकडे सगळं सुरळीत सुरु होतं आणि एक दिवस तो त्या सिंगरला घेउन ccd मधे बसला होता आणि त्याचवेळी पहिली मैत्रीण तिच्या फ्रेंडसोबत कॉफीसाठी तिथे पोचली .. त्याचं दुर्दैव म्हणुयात की अजून काही म्हणा ती सिंगर तिची मैत्रीण होती , ती पटकन तिला म्हणाली . This is Aakash , my bf..मला वाटतं , पुढे काय झालं असेल हे मी लिहायची गरज नाही .. फक्त इमॅजीन करा ..
त्या त्यांच्या वैयक्तिक मॅटर मधे मला जायचेही नाही पण एक मेसेज म्हणुन आपण यातून धडा घ्यावा कारण काळ आणि वेळ बदलायला एक ठिणगी पुरेशी असते .. त्यानंतर जवळपास २ महिन्याने तो मला भेटला होता त्याची ती संपूर्ण स्टोरी ऐकल्यावर मी त्याला म्हटलं , काही गोष्टीचं भान असणं हे आपल्याच हातात असतं.. आपण किती वहावत जायचं हेहीआपल्याच हातात असतं.. एकावर प्रेम करायचं पावित्र्य मल्टीपल रीलेशन्समधे नाही कारण सतत सगळ्याशी खोटं बोलत असताना एक दिवस आपण एकटे पडतो.. १३ वर्षाच्या रीलेशनशिपचा बोऱ्या वाजला आणि प्रचंड स्मोक आणि ड्रींकमधून बाहेर यायला त्याला माझी मदत घ्यावी लागली.. आता तो संपूर्ण स्थिरावला पण त्या दोघींबद्द्ल मला काहीही आयडीया नाही..
त्याचा बिझनेस उत्तम सुरु आहे पण गिल्ट मनात ठेवुन तो प्रत्येक क्षण जगतोय याचं मित्र म्हणुन मला कायम वाईट वाटतं.. चुक कोण किवा बरोबर कोण यापेक्षा कोणाला मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होवु नये असं मला कायम वाटतं..
नाती कायमच ट्रांसपरंट हवीत .. खरं बोलून समोरचा दुखवला गेला तरी चालेल पण खोट्याच्या आधारावर नाती कधीही जोडु नका..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi