या पाऊस मित्राने सगळाच घोळ घातला यार.. दर पावसाळ्यात मी त्याच्या प्रेमात पडते.. आणि त्याला साक्षीदार असतो हा पाऊस मित्र.. दोघांना एकत्र चिंब करतो.. एका कपात कॉफी पिताना कानात येउन विचारतो , ये अंकल कौन है ?? मग मी पावसावरच रुसते.. मला रुसलेलं पाहून तो जोरजोरात बरसतो आणि मी पुन्हा कॉफीत आणि प्रियकरात रमते.काल असच गडगडत असताना आम्ही कॉफी डेटवर गेलो .. त्याने त्याचा हात माझ्या खांद्यावर ठेवला होता .. त्याच्या उबदार स्पर्शाने मी मोहरुन गेले होते. तो म्हणाला , सोनल मोबाईल दे ना .. मला वाटलं , तो माझे फोटो काढतोय .. तो माझ्या wp ला गेला , त्याने आमचे चॅट उघडलं आणि म्हणाला , आपण आपलं प्रेम रीवाइंड करायचं का ??.. How Romantic ना असं माझ्या तोंडुन निघालं.. स्क्रोल करत करत २०२१ पर्यंत गेलो आणि जवळपास तासभर आम्ही मोबाईल मधे मान खुपसुन बसलो होतो.. त्याने जिथून फ्लर्टींग करायला सुरुवात केली ती तारीख सापडली आणि आम्ही मेसेजेस वाचायला सुरुवात केली.. एक एक मेसेज वाचताना आणि त्यावर माझा रीप्ल्याय वाचून दोघेही गुलाबी झालो होतो.. मी पुरती मोहरुन गेले होते.. शेवटी तो म्हणालाच किती पापड बेलावे लागले बघ तेव्हा कुठे तु तयार झालीस.. प्रेम करणं, फ्लर्टींग करणं इतकं सोप्पं असतं का ??.. वेटर ने आणून दिलेलं फुड गार झालं होतं.. भुक मरुन गेली होती.. फक्त त्याच्या मिठीची आस होती .. बाहेर पुन्हा ढग जमा झालेले दिसत होते.. त्याचे love yu चे मेसेज पाहून माझे Happy hormones सीक्रेट झाले होते. त्याला घट्ट मिठी मारली आणि घरी गेले. बेडवर पडणार इतक्यात त्याच्या आवाजात ऐकलेलं गाणं ओठावर आलं .. * ये दिल तुम बिन लगता नही , हम क्या करे * आणि करवटे बदलते रहे सारी रात हम असं म्हणत पहाटे थोडी झोप लागली तर शिल्पा शेट्टी समोर येवुन उभी , सोनल योगा करायचा आहे ना?? .. घड्याळात पहाते तर ५ ,३० झाले होते.. शिल्पा ला म्हटलं , आज रनींग चा मुड आहे.. हम तो चले ग्राउंड.. ड्रेस कुठला घालावा सुचेना.. शुज कुठले घालावे सुचेना.. दिवस तुझे हे फुलायचे ,, झोपाळ्यावाचुन झुलायचे असं काहीबाही होवु लागलं.. अरे बापरे , मी पुन्हा प्रेमात पडले की काय ??.. अरे नको यार… ये अपने बस की बात नही.. २७ वर्षापूर्वी प्रेमात पडले तेच खूप आहे..प्रियकराचा केसाळ हात माझ्या मउ हातावर मोरपिस फिरल्यासारखा फिरताना जाणवत होता .. लाडाने त्याचा हात धरुन त्याला माझ्याकडे ओढणार तितक्यात , सचिनने हाक दिली , उठतेयस ना गं ??.. आज नास्ट्याला काय करणार आहेस ??.. आज लवकर लॅपटॉप ऑन करायचा आहे.. २७ वर्षापूर्वी खाल्लेली माती आणि त्याची ही फळं.. आपली कर्म दुसरं काय.तुम्ही काय वाचताय ??.. कुठला प्रियकर आणि कशाचं काय ..ते फक्त स्वप्नं होतं.. स्वप्नात येवुन फ्लर्टींग करतो म्हणाला , आलाच नाही आणि नवऱ्याला प्रियकर करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही .. त्यापेक्षा पोळ्या लाटलेल्या बऱ्या.. पाऊस सुरु होतोय.. अशी स्वप्नं जरुर पहा.. पूर्ण करायचा प्रयत्नही करा पण संसार सांभाळा..
- #SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist