आपल्या पार्टनरशिवाय वेगळा स्पर्श अधिक का भावतो??
काउंसीलींग करताना अनेक जण माझ्याकडे व्यक्त होतात.. लैगिकतेवर लिहीत असताना अनेक व्यक्तीच्या मनातील प्रश्नांना वाटा मिळतात.. पण अनेकांच्या मनातील एक कॉमन प्रश्न म्हणजे आम्हाला बाहेर मित्र / मैत्रीण किवा प्रियकर / प्रेयसी यांच्या सोबत जास्त मज्जा येते जी घरात येत नाही.. मी वाईट काय आणि चांगलं काय यावर या लेखात लिहीणार नाही कारण अध्यात्म एक सांगतं आणि माणसाच्या इच्छा वेगळं सांगतात मग हे करावं की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न पण चांगलं का वाटतं ??हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उभे रहातात मग अशा वेळी बरेच जण व्यक्त होत नाहीत किवा भावना दाबुन ठेवतात..
लहानपणीचं आठवतय का पहा , आपल्याकडे कितीही चांगलंआणि महागडं खेळणं असलं तरी आपल्याला आपल्या मित्राचच खेळणं हवं असायचं.. कारण काय तर कुतुहल , नावीन्य , वेगवेगळे आकार , वेगळे रंग , वेगळा फील आणि दुसऱ्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही ही सहज प्रवृत्ती.. ते निर्जीव खेळणं त्याला भावना नाहीत पण इथे आपण माणूस आहोत त्यामुळे भावना आल्या , प्रेम आलं , काळजी आली .. दुसऱ्या व्यक्तीचा वेगळा स्पर्श आपल्याला हवा असतो. आपल्या माणसाच्या रोज त्याच त्याच स्पर्शाने माणूस कंटाळु शकतो.. अनेक वर्षे तीच व्यक्ती सोबत असल्याने तोचतोचपणा , व्यायाम न केल्याने सुटलेलं शरीर , योग्य आहार नसल्याने ओघळलेले अवयव. क्लीनलीनेस नसणं ही एकाचीच बाजू नसते तर दोन्हीकडून असते आणि दोघांनाही हा बदल हवा असतो फक्त जास्त प्रमाणात स्त्री हा बदल दाबून ठेवते आणि स्वतःमधे बदल न करता तिच्या इच्छा अपूर्ण ठेवण्यात ती धन्यता मानते याची कारणही वेगवेगळी आहेत.. पूर्वीपासून स्त्रीने घराबाहेर पडु नये किवा पतिव्रता किवा कुटुंब या सगळ्यात ती भरडली जाते पण तरीही हा प्रश्न उरतोच की , पुरूष जेव्हा बाहेर शारीरिक संबंध ठेवतो तो स्त्रीशीच ठेवतो ना ??.. मग ती भावना दाबून ठेवते म्हटलं तर चुकीचही ठरु शकतं.. याचाच अर्थ स्त्रीला सुध्दा बदल हवा असतो..
एकंदरीत विवाहबाह्य संबंध याला कुठलेही ठोकताळे नाहीत आणि मेजरमेंट तर अजिबात नाही .. हा शरीरापेक्षा मनाचा खेळ अधिक आहे.. खरं तर शरीराने मनावर कंट्रोल केला पाहिजे पण जेव्हा मन शरीरावर कंट्रोल करतं तेव्हा वेगळ्या स्पर्शाची , वेगळ्या भुकेची माणसाला ओढ लागते यावर कंट्रोल फक्त आणि फक्त अध्यात्म करु शकते.. कालच मेहबूब म्हणजे माझा मित्र खुप दिवसाने भेटला होता.. बोलता बोलता तो म्हणाला , सोनल जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतो त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल स्पेशल फील करतो ना.. त्या व्यक्तीला शरीर सुखाव्यतिरिक्त इतर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीसाठी भेटावं वाटतं.. त्याची नकळत काळजी घेतली जाते.. त्याचा आदर केला जातो.. कधी कधी जेलस फील करतो.. पण पुन्हा हाच प्रश्न पडतो की , सगळ्याच्या बाबतीत असं होत असेल का ??.. नसेलही.. रात गयी बात गयी असही होत असेल.. वैचारिक लेव्हल काय आहे , त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे.. एकमेकांना आदर दिला जातोय का ??.. स्त्रीकडे कशा पध्दतीने पाहिलं जातं.. संस्कार आणि गरजा, अशा अनेक पैलुनी रीलेशन्स डेव्हलप होतात आणि टिकतात किवा संपतात.
हा विषय सोडायचा म्हटलं तर सोप्पं आहे आणि त्यावर विचार करायचा म्हटलं तर त्याला खुप पैलू आहेत. त्याला खूप खोली आहे.. व्यक्तीगणिक बदलणाऱ्या गरजा आणि त्याची आवड आणि वेगळेपण सगळच संभ्रमात टाकणारं आहे.. माझे वाचक आणि काउंसीलींग साठी येणारे क्लाएंट यांच्यामुळे मी चौफेर विचार करायला लागले आहे हे मात्र खरं आहे… सगळ्याची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist