उन्हाळा दिवस संध्याकाळची वेळ होती.. उन्हाचा पारा कमी झाल्यासारखा वाटत नव्हता. बाभळीवर बसलेले किडे किर्र किर्र असं आवाज काढत ते त्यांच्या भजन किर्तनात मग्न होते . जवळ गेल्याचं चाहूल लागताचं आगदी क्षणभर ते मुके बणत होते. गरम हवा हात, पाय , चेहऱ्याला भाजून काढल्याचा भास होत होता . अंगावरचे कपडे घामाणे ओले झालेले होते. विद्यापीठ परिसरातील कर्मच्यारी आपापल्या वहानाने घरी परतत होते.घरी जाण्याच्या ओढीने वहानाचे कान पिळत ,हॉर्न वाजवत सुसाट पळवत होते .
तेवढयात माझं मोबाईल मला सांगत होतं फोन आलया उचल. मी फोन कोणाचा आहे म्हणून पाहिलो फोन होता परभणीहून.फोन होता अवचार सरांचा.
त्यांनी मला विचारले , ” उद्या किती वाजता परभणीला येता ? बीडला जायाचं आहे.”
मी : ” सर उद्या सकाळी आठ वाजता एसटी बसने येतोय.”
आवचार सर म्हणाले , ” एसटी बसने नका येवू. २ेल्वेने या .दहा वाजता रेल्वे नांदेडहून सुटते.तास सवा तासात परभणी पोहचता.”
मी : ”सर आम्ही दोघं बसनेच येतोय.रेल्वेत कदाचीत जागा भेटणार नाही.”
आवचार सर म्हणाले , ” काही हरकत नाही.या मी बस्टॅण्डलास्टॅण्डला थांबतो .”
उद्या सकाळी लवकर निघायचं म्हणून तयारी केली.सकाळी लवकर उठून आंघोळपाणी करुन ठिक आठ वाजता विष्णूपुरीहून अटोरिक्साने नांदेड बस स्टॅण्ड गाठलो. परभणी बस स्थानकात पॉईन्टवर थांबलेलीच होती.बरेच आसन रिकामे होते.आम्ही दोघं वाहकाच्या मागील आसनावर बसलोत.थोडयाच वेळात गाडी पूर्ण भरली.वाहक चालक आले.चालकाने गाडी सुरु केली तशी वाहकाने तोंडात शिट्टी घेवून फुर्रर्र ss फुर्रर्र वाजत चालकाला गाडी मागे घेवून वळवण्यास मदत केली.वाहक गाडीत येवून त्याच्या आसनावर बसला व घंट्टी मारून गचकन दरवाजा लावला.
गाडी थांबलेल्या गाडयांचा निरोप घेत सावकाश आगदी मंद गतीने बस स्टॅण्डच्या गेटमधून बाहेर पडली.तसा वाहक म्हणाला,” चला पटापट तिकीट घ्या.हाफ टिकीटवाल्यांनी आपल्या जवळचं कार्ड बाहेर काढून ठेवा.”
मी माझ्या जवळचं कार्ड माझ्या हातात घेवून बसलो.हाफ टिकीट घेण्याची ही माझी दुसरी वेळ. मी बालपणी हाफ टिकीटवर कदाचीत एक दोन वेळेस प्रवास केलो असेन.पण माझं बालपण मला आठवलं.माझी उंची कमी होती. माझे दोस्त मला हाफ टिकीटचं म्हणायचे.
वाहकाने विचारले,” बोला कुठलं तिकीट देवू. ”
मी : “दोन हाफ परभणी दया.”
बस जुन्या हिंगोली रोडवरून महाराणा चौकातून फिरुन आनंदनगर भाग्यनगर करून मालेगाव रोडला लागली.गाडी तशी दमाने पळत होती. तिला घाई नव्हतीचं.” मी सारखं खिडकीतून डोकावून पहात होतो.गाडी एकदाची शहर पार करून मोकळ्या रोडला लागली.आता मात्र गाडीने वेग घेतला.उत्तरेकडे तोंड करून पळणारी गाडी मालेगावपासून पश्चिमेकडे तोंड करून पळू लागली.मी रस्त्याला कोण कोणती गावे लागतात हे पहात होतो. गावाच्या नावांच्या पाटयाच नव्हत्या.
गाडी वसमतला आली.क्षणभर तेथील बसस्टॅण्डवर विश्रांती घेतली.बरेच लोक उतरले त्यापेक्षा दुप्पट लोक गाडीत आले.गाडी भरलेली पण गाडीत बसलेले नव्यानव टक्के हाफ टिकीट.
गाडी वसमतहून निघाली.नादेड – परभणी रोड चकाचक आहे.पण रोड बोलका नाही.हा रोड मुका आहे..
खरं तर प्रवास करत असताना प्रत्येक रोड बोलका असतो.आपल्या जवळ वसलेल्या वस्तीची नावे,गावांची नावे तो सांगत असतो. येणाऱ्या जाणाऱ्याचं स्वागत करण्यासाठी जागोजागी कमाणी उभारलेल्या असतात. त्या काणीवर दुरदूरचे मोठमोठ्या गावाचे नाव आंतर लिहिले असते. प्रत्येक रोड पुढे येणाऱ्या गावाची ओळख सांगतो. स्वतःविषयीही प्रवाशांना माहिती देतो.कुठे सरळ आहे.कुठं वाकडा आहे, कुंठ धोक्याचं वळण आहे, कुठे सावकाश चालायचं, कुठं गती घ्यायची, कुठं गतिरोधक आहेत हे सगळं सगळं रोड सांगत असते. कुठे पुल आहे,घाट सुरू, घाट समाप्त ,पेट्रोल पंप कुठे आहे,आतंर किती आहे, तिर्थक्षेत्राच गाव आहे का ?यांची इत्यंमभूत माहिती देणारं रोड मी पाहिलेले आहेत.ते रोड प्रवाशासी गप्पा मारतात,पण नांदेड -परभणी रोड मुका आहे मुका.प्रवाशांसी कट्टी केलेला हा रोड आहे.
मी रोडला बोललो, “आरे बाबा बोलना. तू काळा कुळकूळीत सुंदर दिसतोस बोल ना.पण उत्तर काही मिळालं नाही.मग मी ही गप्प बसून राहीलो.नांदेड -परभणी यांच्यामधील गावे,नदी नाल्यांची नावे मात्र कळाली नाहीत.कदाचीत रोडलाही वाईट वाटत असेल ?मुकंचं रहा म्हणून कदाचीत पुढारी , गुत्तेदार यांचं दबाव असेल ?
खिडकीच्या बाहेर डोकावून पहात होतो.तेवढयात माझ्या मागील आसनावर बसलेला एक ( गाडीत सगळेच एक दोन अपवाद वगळता स्त्री पुरुष म्हातारेच होते) म्हातारा माणुस म्हणाला, ” ए कंनडाक्टर माजं गाव मांग गेलं की बेल का वाजविला नायीस. किती पुडं घेवून आलास. हात तू ज्या मायीला “
चालक : ” या हाफ टिकीटवाल्यांनी डोस्क खालंय बगा.रेल्वेत आसचं बोलता का आजोबा? “
म्हातारा : ” काय बी बोलूलास.म्या काय रेलगाडीत बसलाव का? “
एसटीतील प्रवाशी हसायला लागले.चालकांनी गाडी बाजूला घेतली.गावरानी शिव्या घालत तो माणुस खाली उतरला.गाडी पुन्हा पळायला लागली.मग अचानकच मला कृषी विद्यापीठाची कमान दिसली.
मी हसलो व मनामनात म्हणालो,” रोडला वाचा फुटली की काय? ” तेथून पुढे पंधरा वीस मिनीटात गाडी बसस्थानकात पोहचली.अवचार सर कार घेवून तेथे आले होते.एसटी बसमधून उतरल्याबरोबर कारमध्ये जावून बसलो.सरांच्या घरीही गेलो नाहीत.अवचार ताईनां बरे वाटत नसल्यामुळे आम्ही दोघं व अवचार सर असे तिघंच गाडीमध्ये होतो.एसटी बसमधून उतरल्याबरोबर कारमध्ये जावून बसलो. संगीताच्या घरीही गेलो नाहीत.अवचार ताईनां बरे वाटत नसल्यामुळे आम्ही दोघं व अवचार सर असे तिघंच गाडीमध्ये होतो.अवचार सर परभणीतील दुय्यम दर्जाच्या रसत्यांचे वर्णन करत होते. व तेथील आमदार खासदार (आजी व माजी) फक्त गल्ले भरू होते असे मला सांगत होते.गाडीने बऱ्यापैकी वेग घेतलेला होता. सर परभणीचेच असल्यामुळे त्यांना तेथील राजकारण , समाजकारण सगळं माहित आहे.
गाडी शहराच्याबाहेर पडली.मी विचार करत होतो नांदेड – परभणी रोड तर माझ्याशी बोलले नाही.परभणी बीड रोड बोलेल का ?हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. हां हां म्हणता गाडी शहराबाहेर पडली.गाडी चालकाने पोखर्णी फाटयावरुन गाडीमधल्या मार्गे घेतली.हा रस्ता माझ्यासाठी पूर्ण नवीन होता.पण रस्ता फारच बोलका होता.गावाचे नाव, वळण,मंदिर, हॉटेल आसी सगळी नावे सांगत होता.रस्ता चकचकीत होता पोखर्णी, पाथ्री, माजलगाव , निथरुड, पात्रुड , तेलगाव, वडवणी , मैंद व ढेकणमोहा अशी अनेक गावे ओलांडत गाडी पळत होती . बहुधा माजलगावाच्या आलीकडे सस्ता थोडासा दुःखी होता. रस्ता म्हणाला,” येथेच माझ्या शरीरावर भेगा पडलेल्या आहेत.सध्यातरी माझ्याकडे कुणाचही ध्यान नाही. सगळेच राजकारणात मग्न आहेत. मी मात्र भग्न बनत आहे. मी अनेक संकट झेलत आलोय पुढे झेलत रहावं लागेल.”
मी काहीही बोललो नाही.पण हा रस्ता निश्चित बोलका होता.त्याच्या दोन्ही बाजूंची माहिती पुरवत होता.
कारचालक ही त्यांच्याजवळील माहिती पुरवत होता.कोणते हॉटेल चांगलं आहे.कोणते पदार्थ तेथे मिळतात हे सांगत होता.माजलगावच्या पुढे एका हॉटेलवर बरीच वहाणे थांबलेली होती.ती वहाणे दाखवत चालक म्हणाला,” सर येथे स्पेशल जेवन भेटते.”
मी : ” स्पेशल जेवन ? “
तो म्हणाला, ” येथे कंदूरी मटन भेटते.” त्यात आम्हाला काही इंटरेस्ट नव्हतं.रस्ता छान होता. गाडी रस्त्याला पाहून खुष होती.आनंदाने पळत होती.वडवणीला आलोत.वडवणीच्या पुढे मात्र रस्ता भलताच सुस्त वाटत होतं. दुःखीही होता. खोदून ठेवलेला होता. वहानंही चिडून त्याच्यावरून उडया मारत चालल्या होत्या.गाडया ची खूपच वर्दळ होती . गर्दीमुळे पळता येत नव्हतं. त्यामुळे एकमेकाच्या जवळ थांबत होत्या. गाडींचा बाजार भरला होता. गाड्या अजीबात पुढे सरकत नव्हत्या. गाडया का सरकत नाही याचं कारण होतं त्यादिवशी भाजपा लोकसभेचे उमेदवार फॉर्म भरणार होते.परभणीहून वडवणीला पोहचायला जेवढा वेळ लागला तेवढा किंवा त्यापेक्षा जादा वेळ वडवणीहून बीडला पोहचायला लागला.कासव गतीने ढेकणमोहा गाठलोत. तेथून संजीवणी सिरमेवार/ सुरकूटवार फोन लावला.संजीवणी म्हणाली,”आजून किमान अर्धातास लागते सर.”
मला प्रश्न पडला ढेकणमोहा नाव असं का ठेवलं असेल? त्याचबरोबर मी मॉडेटर असताना मादळमोही गावाच्या शाळेतील एसएससी बोर्डाचे उत्तरपत्रिका आल्या होता.विनाकारणच मादळमोहीची आठवण झाली.विचार आला आणि गेलाही.नंतर विचार चक्र सुरु झालं, बीड हे नाव का पडलं असेल ?बीड म्हणजे काय ?बीड लोखंडाचं प्रकार आहे ?आसं लहानपणी मी अंधुकसं ऐकलोय आसं वाटतय.
बीड शहरात प्रवेश करताना जाणवलं की कदाचीत मराठवाडयात सगळयात मागास जिल्हा आहे.तेथील नदीही महाराष्ट्रातील इतर नदीसारखीच आजारी व दुःखी भासली. बालाघाटाच्या कुशीत वसलेलं हे शहर भकास वाटत होतं. रोडलगतच्या इमारती, हॉटेल्स बऱ्या वाटत होत्या. पण समोरचा रस्ता मात्र रडकाच वाटला.तसं माझं गाव ही बालाघाट डोंगरावरच वसलेलं आहे.समदुःखी असल्यामुळे मला त्यात काही नवल वाटलं नाही.
मी विचार करत होतो बीड जेव्हा वसलं असेल तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूस टेकडया असतील व मधला भाग बीळासारखं असेल.मग शेजारपाजार गावांचे लोक म्हणले असतील ते उंदिराच्या बिळात वसलेलं गाव ,पुढे बीळगाव नंतर त्यांचं अपभ्रंस होवून बीर बीड असं झालं असेल.असं मी विचार करत होतो.बीडचं बाहेर देशातील लोक बीर असंच उच्चार करतात. नांदेडला नांदेर असंच उच्चार करतात. काहीही असो बीड थोडं मागासच दिसले मला.
बीडला पोहचल्यानंतर माझे सहकारी मित्र कै.सय्यद सरांची आठवण प्रकर्षाने जानवली.कारण ते बीडचे रहिवाशी होते. विष्णुपुरीत आम्ही दोघं सकाळी नियमित एकत्र फिरायला जात होतो.शाळेतही एकदिलाने काम करायचो.शारीरिक शिक्षक म्हणून त्यांनी खूप छान काम केलेले होते.
बीडला पोहचल्यानंतर पुन्हा आम्ही संजीवणीला फोन केलोत.ती एका हॉटेलचं नाव सांगून तेथे थांबवण्यास सांगितली.आम्ही तेथे जावून थांबलो न थांबलो तोच तेथे संजीवणीचा भाऊ घेण्यासाठी आला.त्याची मोटारसायकल सांगेल त्या दिशेने कार पळू लागली.शिवणापाणी, लपाछपीचा खेळ खेळल्यासारखं बोळीबोळीतून गाडी मोटारसायकलच्या मागे पळत एकदाचं घरी पोहचली. टुमदार घराला रंगरंगोटी केलेली होती . घराला नाव ”सिचंमा ” आसं दिलेलं आहे. मी निघताना विचारलो, ” सिचंमा ? ” संजीवणीनं उत्तर दिलं ” सिरमेवार चंद्रकला / चंद्रमा मारोतीराव.” बरोबर आठवत नाही. घरात सग्यासोय-यांची वर्दळ, लगबग चालू होती.ओळखीचे कोणीच नव्हते. नवीन नवरी व नवरदेव घरात होते.
संजीवणी दवाखाण्यात अडमीट होती.ही गोष्ट तिने फक्त मलाच सांगितली होती.पण तिला नेमकं काय झालं हे तिनं सांगितलं नव्हतं.ती मला येवढंचं बोलली,” सर मी दहा पंधरा मिनीटात घरी येते.”
ती येईपर्यंत घरी असलेल्यांनी चहापाणी केलं.थोडया वेळात आजारी संजीवणी हसतच घरी आली.तिच्याच चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.तिचं आजारपण तिनं त्या क्षणी विसरलं होतं.ती खूपच आनंदी दिसत होती. आमाचा यथोचित सत्कार तिने केला.मग बराच वेळ गप्पागोष्टी झाल्या.जेवण केलोत व पुन्हा परभणीला परत निघालो.निघताना तिने अवचार सर व आम्हा दोघांचं कपडे आहेर करुन आमची रवानगी केली.परभणीकडे येताना फारशी ट्रॅफीक नव्हती.चालक गाडी सुसाट वेगाने पळवत होता.दोन सव्वादोन तासात परभणी येथे संगीता कदम -अवचार यांच्या घरी आलोत.घरुन निघतानांच संगीताच्या घरी थांबायचं असं ठरवूनच नांदेडहून निघाले होतो कारण संगीताने तसं माझ्याकडून वदवूनच घेतले होते.संगीता व जावाईबापू यांनीही संजीवणी सारखचं हसतमुखाने स्वागत केलं.नंतर अवचार ताई,अवचार सर व आम्ही बराच वेळ गप्पा झोडत बसलो.
आठ साडेआठ वाजता जेवन करुन संगीताचं कुटुम्ब व आम्ही जवळपास रात्रीच्या दिड दोन वाजेपर्यंत बोलत बसलो.या बोलण्यात सिंहाचा वाटा होता जावईबापू डॉ . दिगांबरराव कदम यांचा.त्यांनी आम्हाला अहराविषयी अतिशय महत्वाची व उपयुक्त माहिती दिली.मी अधुनमधून प्रश्न विचारत होतो.त्या प्रश्नांचं सखोल उत्तर त्यांनी दिलं.त्या व्यतिरिक्त इतरही गप्पागोष्टी रंगल्या.त्या दिवशी रात्री उशिरा झोपलोत.
दुसऱ्या दिवशी थोडं उशिराच उठलो. सकाळची आवश्यक काम उरकून घेवून नांदेडला निघण्याची तयारी केली.संगीताने गरम गरम जेवन तयार करून खाऊ घातलं.निघताना संगीता व जावईबापू ,अवचारताई व अवचार सरांनी टॉवेल टोपी व साडी चोळीचा आहेर देवून आमची रवानगी केली.माझ्या मनात एक विचार चमकून गेलं जीवनात निखळ, निर्मळ व सच्चा आनंद घेण्यासाठी एकतरी मुलगी व एक सच्चा मित्र असावंच लागते.
संजीवणी व संगीताच्या घरी आम्हाला खूप आनंद मिळाला.त्या आनंदाच वर्णन शब्दांत मला नाही करता येणार.त्याचं वागणं बोलणं हे नेहमीच आमच्या काळजात आम्ही दोघं कायमचं जतन करून ठेवलेलं आहे.
नऊ सव्वानऊ वाजता आम्ही रेल्वे स्थानकात पोहचलो.रेल्वे गाडी परभणीहूनच निघणार होती.आगदी वेळेवर अटोने आम्ही रेल्वे स्थानकात आलो.तिकीट काढून गाडीत जावून बसलो.रेल्वे डब्यात जागा मोकळीच होती.गाडीत बसल्यानंतर बराच वेळ गाडी थांबली होती. प्रवाशी त्याच्या सोबतीसोबत गप्पा मारत बसले होते.कोणी हसत होते.कोणी खिदळत होते. कोणी खिडकीतून डोकावून बाहेर पहात होते.या गप्पाटप्पानंतर गाडीने प्रवाशास सूचना दिली “बसा पटकन मी आता नांदेडकडे रवाना होत आहेत.” एक दोन वेळा गाडीने सांगितल्यानंतर हळूच झटका देत सरकली.थोड्यावेळाने गाडीने वेग घेतला.गाव आलं की वेग कमी झाल्यासारखं वाटायचं.गाडी सिट्टी मारत धावत होती.पूर्णा, लिंबगाव करत गाडी नांदेडच्या रेल्वे स्टेशनला दम घेत थांबली.आता ती किती वेळ दम घेत थांबणार होती हे मला माहीत नाही.आम्ही अटोने संगीताचं कुटुम्ब,संजीवणीच्या कुटूबांची व अवचार सर व ताईची मधूर आठवणीत विष्णुपुरी कधी गाठलोत हे कळालेच नाही.
राठोड मोतीराम रुपासिंग
विष्णूपुरी, नांदेड -६
९९२२६५२४०७