कंधार : प्रतिनिधी
दिनांक-17.05.2024 रोजी शुक्रवारी दुपारी 03.00 वाजता तहसिल कार्यालय लोहा येथे मा. जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय पाणी टंचाई व मान्सुन पुर्व आढावा व तयारी या विषयावर सविस्तर आढावा बैठक तहसिल कार्यालय लोहा येथे पार पडली.
सदरील बैठकीत मा. उपविभागीय अधिकारी संगेवार मॅडम यांनी अधिग्रहणाबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी माहिती दिली तसेच अधिग्रहन केलेल्या स्त्रोतांची आरोग्य विभागामार्फत पाणी तपासणी करण्याच्या सुचना दिल्या.सदरील बैठकीत मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना सविस्तर मार्गदर्शन व आवश्यक त्या सुचाना दिल्या.
बैठकीत कंधार तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, मंडळअधिकारी व सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. यावेळी टँकर चालु असलेल्या गावातील पाणी पुरवठयासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी संबंधीत यंत्रनांना सुचना दिल्या. तसेच
तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी बैठकीत उपस्थित सर्वांना मान्सुन पुर्व तयारी बाबात पुर्ण मार्गदर्शन केले.
सदरील बैठकीस नायब तहसिदार रेखा चामणर, उर्मिला कुलकर्णी व लोंढे नायब तहसिलदार उपस्थित होते.सदरील बैठकीचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री थोटे एम बी यांनी केले.
जंगमवाडी येथे मन्याड नदी च्या पात्रातुन गाळ काढणे च्या मोहीमेस भेट……
आज दिनांक 17.05.2024 रोजी दुपारी 04.00 वाजता मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब सायंकाळी चार वाजता जंगमवाडी येथे मन्याड नदी च्या पात्रातुन गाळ काढणे च्या मोहीमेस भेट देऊन पाहनी केली व शेतक-यांना गाळ काढण्याबाबत प्रोत्सहान दिले.
• सदरील भेटी दरम्यान मा. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम व तहसिलदार रामेश्वर गोरे साहेब उपस्थित होते.