पाणीटंचाई व बी-बियाणे,खतांबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतला आढावा

 

नांदेड, दि. १८ मे २०२४:

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात काही गावांमध्ये उद्भवणारी पाणी टंचाई तसेच आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने बी-बियाणे, खते, औषधींच्या पुरवठ्याबाबत आढावा घेण्यासाठी पक्षांतर्गत बैठक घेतली. त्याचप्रमाणे याबाबत नागरिकांच्या तक्रारी किंवा सूचना आल्यास त्यावर आवश्यक ती पावले उचलण्यासाठी तालुकानिहाय जबाबदारीचे वितरणही केले.

शनिवारी दुपारी खा. चव्हाण यांनी याविषयी घेतलेल्या बैठकीला विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, किशोर स्वामी, भाजपचे अर्धापूर तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव इंगोले, बालाजी गव्हाणे, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी उपनगराध्यक्ष राजू शेटे, मुदखेडचे बाळासाहेब देशमुख बारडकर, भाजप तालुकाध्यक्ष केशव खटिंग, मुदखेडचे माजी नगराध्यक्ष सुनिल शेटे, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम, भोकर कृ ऊ बा चे सभापती जगदीश पाटील भोसीकर, भाजप तालुकाध्यक्ष गणेश कापसे, भगवान दंडवे, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, विशाल माने भाजप शहराध्यक्ष आदी उपस्थित होते.

याप्रसंगी खा. अशोकराव चव्हाण यांनी तीनही तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, खरीप हंगामाच्या अनुषंगाने खते, बी-बियाणे, औषधांची उपलब्धता व अनुषांगिक अनेक विषयांचा आढावा घेतला. अनेक पदाधिकाऱ्यांनी काही सूचना मांडल्या व त्यावर विचारविनिमय करण्यात आला. कोणत्याही कारणास्तव पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असेल तर संबंधित गावात तातडीने पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भोकर विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आणि खते, बी-बियाणे, औषधांची उपलब्धता याबाबत नागरिकांची काही अडचण असल्यास त्यांनी संबंधित तालुक्यातील भाजप कार्यालयात सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *