मला सेक्समधे रुची नाही…

सेक्समधे रुची नसणं आणि लैगिकतेच्या काही समस्या असणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.. लैंगिकतेच्या समस्येवर नक्कीच उपाय आहेत .अनेक पध्दतीने याचा विचार करुन त्यावर मार्गदर्शन करता येतं.. याचा संबंध डाएटशीही आहे.. याचा संबंध व्यायामाशी आहे.. याचा संबंध त्या व्यक्तीमधे असलेला आदर आणि प्रेम याच्याशी आहे.. क्लीनलीनेसशी आहे.. आणि आरोग्याशीही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर काम करुन आणि त्यात बदल करुन उत्तम पध्दतीने मार्गदर्शन करुन लैगिक समस्या सोडवून त्यांचं लैगिक जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न करु शकतो.. मी दिलेल्या मार्गदर्शनाने त्यांनी योग्य तो बदल केला तर त्या जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सुखकर होवु शकतं.. बऱ्याचदा योग्य पध्दतीने आणि योग्य वेळी सेक्स न केल्याने प्रेगनन्सी राहायला अडचणी येउ शकतात त्यासाठी याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे..

पण जेव्हा यातील कुठलीही समस्या नाही आणि ३० वयोगटातील स्त्री म्हणते मला आवड नाही अशा वेळी त्या नवऱ्याने काय करावं ??.. आणि काउंसीलर म्हणुन मी त्यावर काय उत्तर द्यावं ??.. हस्तमैथुन किती वेळा करणार आणि त्यातून आनंद किती मिळणार ??,, सेक्स च्या बदल्यात रोज हस्तमैथुन हा पर्याय असूच शकत नाही.. अध्यात्म म्हणतं , आपल्या पार्टनर शिवाय बाहेर सेक्स करणं हा व्यभिचार आहे..स्त्री स्वतः देत नाही आणि बाहेर गेलं की संशय घेते त्यामुळे सारखी भांडणं होतात.. फक्त मैत्रीण असली तरी तिला चालत नाही कारण आपण नवऱ्याला सुख देत नाही हे सतत सलत रहातं आणि त्यामुळे संशयवृत्ती बळावते.. परिणामी मानसिक आरोग्य बिघडतं.. भांडणं होतात.. प्रकरण घटस्फोटापर्यंत जातात..

किती विचित्र चक्र आहे पहा ना.. काल मला एकाने विचारलं .. ,मॅम सिच्युएशन शिप म्हणजे काय ??.. मी अशा मार्गाचा अवलंब करावा का ??.. किवा कॉलगर्ल किवा अजून काही ??.. खरं तर रीलेशनशीप आणि सिचुएशनशिप या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.. सिच्युएशन शिपमधे नो कमीटमेंट.. नो अटॅचमेंट.. नो प्रेम…जेव्हा पाहिजे तेव्हा सेक्स करायचा .. कंटाळा आला की तिथून बाजूला व्हायचं ही नवीन कंसेप्ट रुजु घातली आहे .. पण इथे तितकेच धोकेही आहेत कारण त्या दोन्हीपैकी एकजण जरी मेंटली आणि फीजीकली इंव्हॉल्व्ह झाला आणि त्याला त्या व्यक्तीची सवय लागली की भांडणं होतात कारण समोरचा म्हणतो , आपलं असं काही ठरलच नव्हतं.. बाहेरची दुनिया वेगळी आहे आणि आपलं मन कधी कोणामधे गुंतेल याचा भरोसा नाही.. वारंवार भेटी ,शेअरींग केअरींग याने प्रेम होवु शकतं.. मग ती व्यक्ती दुसरीकडे शेअर होतेय हे आपल्याला झेपत नाही.. त्यापेक्षा नवरा बायको मधे उत्तम बॉंडींग असेल.. जबाबदारीची जाण असेल.. शारिरीक सुख ही नात्यांची गरज आहे .. विवाहसंस्था ही यासाठीच आहे याबद्दल माहीती असणं . सेक्सची आवड नाही असं म्हणुन अडचण मिटत नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात .. इथे नात्याचा खरा कस लागतो.. आळस हा मोठा शत्रू आहे तो दुर केला तर आणि तरच अनेक गोष्टी आपण साध्य करु शकतो..

लैगिकतेबाबतीतही तेच आहे.. वाढलेलं वजन हेही याला कारणीभूत आहे.. व्यायाम नाही त्यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी किवा ब्लड सर्क्युलेशन होत नाही.. आहारात प्रोटीन्स , लोह ,कॅल्शियम याची कमतरता त्यामुळे येणारा डलनेस या सगळ्या गोष्टी लैगिकतेला बाधा आणतात.. सेक्स केल्याने माणूस जास्त ॲक्टीव्ह रहातो आणि ॲक्टीव्ह असल्याने तो भरपुर सेक्स करु शकतो.. दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत.. त्यामुळे लैगिकतेबद्दल पूर्ण जाणून घेउन , नात्यांची गरज ओळखून आपल्याला बॅलंस साधता यायलाच हवा..
#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *