टायटल वाचून हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा कारण याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल.. खरं तर या दोन्हीची बरोबरी होवूच शकत नाही आणि दोन्ही पैकी एक आपण निवडूच शकत नाही..
अशीच एक व्यक्ती जी ३५/४० वयोगटातील .. नोकरीनिमित्ताने तिला कुटुंबापासून दुर रहावे लागते.. जेव्हा कुटुंबापासून दुर बॅचलर म्हणुन आपण रहातो तेव्हा खरं तर संस्कार दिसतात आणि
आपल्याकडे वाचन , गायन , नृत्य , पेंटींग अशी एखादी कला असेल किवा व्यायामाची आवड असेल किवा चांगले मित्र जोडण्याची कला असेल किवा आध्यात्मिक ऐकणं असेल किवा चांगले सिनेमा पहाणं असेल , सामाजिक कामाची आवड असेल अशा अनेक गोष्टी करता येतात आणि आपले मन भरकटत नाही .. पण जास्तीत जास्त वेळा आपण चांगल्या गोष्टी सोडून वाईट मार्गालाच लागतो आणि त्यातून आर्थिक नुकसान होतेच पण मानसिक आरोग्य खराब झाल्याने ती व्यक्ती डीप्रेशन मधे जाते मग अशा वेळी त्यातून बाहेर पडायला त्याला काउंसीलर ची गरज लागते. काउंसीलर हे त्या व्यक्तीच्या मनावर काम करतात..
शारीरिक आजार हे २०% असतील पण मानसिक आजार हे जवळपास ८०% असावेत इतका मोठा रेशो असतो.. आपल्याला न दिसणारा अवयव हाच आपल्या ताब्यात नसतो कारण मन शरीराला कंट्रोल करायला बघतं .. खरं तर शरीराने मनावर कंट्रोल केला पाहिजे आणि हे खुप अवघड आहे त्यासाठी मेडीटेशन , प्राणायाम याने उत्तम रिझल्ट मिळतात..अनेकांना वाटु शकतं की आपल्याकडे पैसा आहे .. आपल्याला बाकीच्या गोष्टीची काय गरज ??.. किवा इतर माणसांची काय गरज ??.. पण पैसा हे साध्य असावं की साधन हे ज्याचं त्याने ठरवावं आणि कुढत बसण्यापेक्षा लहान गोष्टीत आनंद शोधावा.. जसं पैशाशिवाय आपण जगू शकत नाही तसच माणसांशिवाय आपण जगूच शकत नाही..
आता वर उल्लेख केलेल्या व्यक्तीकडे येते .. ती व्यक्ती माझ्याकडे काउंसीलींगला आली होती .. त्यांनी सांगितलेली माहिती माझ्यासाठी सुध्दा नवीन होती.. मला डेटींग ॲप असतात माहीत होत्या पण पैसे देउन आपण न्युड स्त्रीया किवा त्यांची फिगर पाहु शकतो अशी ॲप आहेत हे मला माहितच नव्हतं . रिकामं मन सैतानाचं घर .. ते रिकामं मन रोज संध्याकाळी त्या ॲपकडे धाव घेउ लागले आणि त्यात भरपूर पैसा जाऊ लागला किवा जातोय हे कळतय पण तरीही ॲप डीलीट होइना.. एकदा डीलीट केलेलं ॲप पुन्हा पुन्हा डाउनलोड केलं जातं आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या आणि त्यामागुन येतं डीप्रेशन.. त्या स्त्रीयांचे बुब्ज पाहून आपल्या बायकोचे बुब्ज लहान वाटू लागतात .. त्या स्त्रीयांनी घातलेले कपडे पाहून तसेच कपडे त्याच्या बायकोने घालावे वाटतात.. चांगल्या उच्चशिक्षीत घरातील मंडळी जर अशी वागली तर काही वर्षांने सगळे मानसिक रुग्णच दिसतील की काय अशी भिती वाटायला लागते.. आपण चांगल्या सवयी लावून घेणं हे आपल्याच हातात आहे.. कारण वेळ खुप मौल्यवान आहे तो परत आणता येत नाही.. आजकाल मोबाईलमुळे वाचन थांबलय.. मैफीली थांबल्या.. गप्पा दुरावल्या.. भेटी नको झाल्या आणि इगो पायी आपण अशी कृत्य करु लागलो.. सगळ्याना नम्र विनंती आहे , कृपया वेळेत जागेवर या.. उत्तम माणसे जोडा.. संवाद वाढवा.. आपल्या कला जोपासा.. खुप जणाना पहाते मी रात्री १२/ १२. ३० पर्यंत ol असतात.. समोरच्या व्यक्तीसोबत फ्लर्टींग करत रहाणं आणि आपली झोप घालवुन शरीराची हानी करुन घेणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करा.. लवकर निजे लवकर उठे त्यास दिर्घायुष्य लाभे.. जो कमी खातो तो निरोगी रहातो.. जो वेळा पाळतो तो लवकर पुढे जातो. Beautiful Dp.. yu r Gorgeous ही वाक्ये तिला अजून दहा जणांकडुन येत असतात त्यामुळे वेळेत झोपा आणि असली ॲप आजच डीलीट करा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist