युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांना नांदेडरत्न पुरस्काराने गौरव

शिवालय उद्योग समूहाच्या वतीने, भक्ती लॉन्स भावसार चौक नांदेड येथे दिनांक 31 मे 2024 रोजी. नांदेड जिल्ह्यातील अनेक क्षेत्रांमधील काम करणाऱ्यांना नांदेड रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्यांनी अगदी कमी वयात गरुड झेप घेऊन समाजासमोर एक आदर्श चेहरा ओळखला जाणारा नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र समाजसेवक सुप्रसिद्ध निवेदक युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांना आणि तसेच साहित्यिक डॉ. हंसराज वैद्य, रिल्स स्टार गिरी गजानन, उद्योजक आकाश मादसवाड, रिल्स स्टार कल्पना खानसोळे, रिल्स स्टार जयश्री राठोड, अविनाश खानसोळे त्यांच्यासह अनेकांना नांदेड रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजिका शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्ष सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा ठेवण्यात आला. नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील अनेक मान्यवरांच्या हस्ते नांदेड रत्न पुरस्कार पुरस्कार प्रधान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार झी मराठी चला हवा येउद्या फेम सतीश कासेवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *