विवाहबाह्य संबंध

विवाहबाह्य संबंध आणि त्यातही एकापेक्षा जास्त पार्टनर..
हे खरय का ??..
कधी घृणास्पद .. कधी हास्यास्पद.. कधी चारित्यहिन … कधी संस्कारहिन … ऐकल्यावर बरच काही वाटतं ना..
काय व्यक्त व्हावं यावर .. याही गोष्टी व्यक्तीगणिक बदलतात..त्यांच्या गरजा काय आहेत त्यानुसार नात्याला रंग भरला जातो.. सप्तपदी घेउन जेव्हा लग्न होतं तेव्हा सातवं पाऊल हे त्याच पार्टनर सोबत कायमस्वरूपी रहाण्याचं वचन असतं ते आपण मोडतोच पण नंतर घराबाहेर दिलेला शब्दही आपण मोडतो.. याला प्रेम म्हणायचं का ??.. एकीसोबत बसलेला असताना किवा एकीला खुश करत असताना दुसरीला मिसींग यु असा मेसेज केला जातो. म्हणजेच तो नक्की कोणाला फसवतोय ?? .. स्वतःला की त्या दोघीना ??.. हेच स्त्रीच्या बाबतीतही घडु शकतं.. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं तर ही गोष्ट आपल्या लक्षात येवु शकते.. एकतर माहीत असुन त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं किवा त्या व्यक्तीपासून बाजूला होणं हे दोनच पर्याय त्या व्यक्तीकडे असु शकतात…

जेव्हा आपल्या पार्टनरला सोडून आपण बाहेर इंव्हॉल्व्ह होतो तेव्हा मग फक्त त्याच व्यक्तीसोबत आपण का रहात नाही ?? बदल हे कारण असेल का ??.. किवा आधीपेक्षा ती व्यक्ती जास्त चांगली आहे हे कारण असेल.. किवा त्या व्यक्तीकडुन तिच्या गरजा भागल्या जात नाहीत कि पार्टनर बदलायची लागलेली सवय .. मग यात प्रेम कुठे आहे ??.. याचा अर्थ लग्न झालेल्या व्यक्तीवर पण आपलं प्रेम नाही असा होतो का ??विचार करुन डोक्याचा भुगा होतो मग करणाऱ्याला तर किती गोष्टी मॅनेज कराव्या लागत असतील ना.. प्रत्येकीला काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं आणि रोज नवीन ॲक्टींग करत मी कसा किवा कशी सभ्य आहे किवा माझं तुझ्यावरच प्रेम आहे …. तत्सम.. यातुन साध्य काय होणार ??.. आध्यात्मिक दृष्ट्या याचे रिझल्ट वेगळे आहेत पण मानसिक आरोग्य खराब करुन घेण्याची ही लक्षणे आहेत.. कारण सतत खोटं आणि लपवाछपवी करताना आपण आपल्या व्यवसायात / नोकरीत / संसारात स्टेबल रहात नाही.. परिणामी प्रगतीला बाधा येउ शकते..

गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीची लेडी मला म्हणाली , ती स्वतः मॅरीड आहेच पण तिचा बॉयफ्रेंड तिला आर्थिक मदत करत नाही किवा गिफ्ट देत नाही म्हणुन तिला अजून एक मित्र हवा आहे.. तिची विचारसरणी चूक आहे कि बरोबर माहीत नाही.. पाप पुण्य ,चुक बरोबर या फंदात न पडता बदलत चाललेली मानसिकता काय आहे याचा मी अभ्यास करते.. कलियुग कि राक्षसीवृत्ती ??. की भरपूर पैसा आल्याने आलेला माज .. किवा बेफीकीर वागणे .. सगळीच न सुटणारी कोडी आहेत..

आपल्याला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत हेही एक कारण असावे आणि आधुनिकतेच्या नावाखाली स्वैरपणे वागणं हेही कारण आहे का ??
या सगळ्यामुळे रात्री उशीरापर्य्नत जागं रहाणं , एकावेळी अनेकांसोबत चॅटींग / फ्लर्टींग .. पुरेशी झोप न होणं आणि त्यामुळे सकाळी व्यायामाला न उठणं.. मग ॲसिडीटी वाढणं असेल याचा परिणाम डोळे आणि मेंदुवर होणं सगळीच हानी आहे.. प्रेम असेल तर फायदे नक्की आहे पण प्रेमाची ॲक्टींग असेल तर फक्त मानसिक , शारीरिक हानीच आहे.. काउंसीलींगसाठी अशा प्रकारच्या मध्यमवयीन केसेस जेव्हा येतात तेव्हा वाईट वाटतं आणि बदलत असलेल्या मानसिकतेची किव येते.. पुढील काही वर्षात संसाराचे भयाण चित्र अनुभवायला मिळणार यात शंका नाही.. काय चुकतय आणि कुठे थांबायचय हे आपल्याला कळायलाच हवं तरच त्यावर मार्ग सापडेल..

#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

 

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *