लाल परीचा 76 वाढदिवस कंधार आगारात उत्साहात साजरा

 

कंधार : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीचा 76 वा वाढदिवस कंधार आगारात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बसेस व बस स्थानक सजून केक कापून वाढदिवस रविवार दि 2 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला

राज्य परिवहन महामंडळाच्या 76 व वर्षात पदार्पण झाले यानिमित्त कंधार आगारात बस स्थानक हे फुलाने केळीच्या पानाने रंगरंगोटी करून रांगोळी काढून प्रवाशाला गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी महामंडळाची लाल परी एसटीला फुलाने सजून तिच्या 76 वा वाढदिवस चिमुकल्या विद्यार्थ्याने केक कापून साजरी करण्यात आले

 

यावेळी कंधार आगाराचे आगार प्रमुख अभय वाढवे शिवसाब कारामुंगे जगदीश मटंगे के जी केंद्रेस सौ गीता आंबेकर चंद्रकांत श्रीमंगले ज्ञानेश्वर कोंडामंगले जी डी गोणारे ब्रह्माजी गीते भगवान चव्हाण आशिष जोगे यासह आगारातील चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *