लोहा ; लोहा -पालम -कंधार या तालुक्यात रुग्णांसाठी डॉ मिलिंद धनसडे व त्याच्या टीम करत असलेले वैदयकीय कार्य निश्चितचगौरवास्पद असून येत्या काळात मेडिकेअर या अद्यावत हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करू जेणेकरू ग्रामीण भागातील जनतेला उपचारात मदत होईल .तसेच राज्य क केंद्रातील आरोग्य सुविधा येथे उपलब्ध करून देत येतील काय यासाठीही प्रयत्न राहील असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
लोह्यातील डॉ मिलिंद धनसडे याच्या मेडिकेअर हॉस्पिटल स्थलांतर व शुभारंभ जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रविवारी २ जून रोजी पार पडला यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी , शेकाप प्रदेश महिलाअध्यक्षा आशाताई शिंदे,भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर,
माजी नगराध्यक्ष वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल , दता वाले, भास्कर पवार, करीम शेख, पंचशील कांबळे, दीपक कानवटे, मिलिंद पवार, बाळू खोमणे, हरिहर धुतमल डॉ मिलिंद धनसडे , डॉ शमा बुक्तरे, डॉ बुक्तरे, डॉ भोसीकर डॉ आचने भारतबाई धनसडे उत्तम धनसडे प्रा.शारदा धनसडे, आनंद धनसडे ,सचिन मुकदम यांची उपस्थिती होती .
खासदार चिखलीकर यांनी डॉ धनसडे यांच्या रुग्णसेवेचा गौरव केला .आमदार असताना जे जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना उपचारा दरम्यान ते होत्व असे सांगून त्यांनी गरिबीतून शिकून त्यांनी एवढे उभे केले याच्याआई वडील भाऊ सहकारी यांच्या मेहनतीची आठवण त्यांना आहे त्याची रुग्ण सेवा गोरगरीब माणसांच्या गरजेची असून येत्या काळात त्याच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये म.फुले जनारोग्य सेवा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य सेवा उपल6 करून देण्यासाठी प्रयत्न करू असे चिखलीकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ धनसडे यांनी आरोग्य सेवा माफक दरात देण्याचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होणार आहे असे सांगून त्यांनी आपल्या आरोग्य सेवेचा व शालेय शिक्षणाच्या आठवणी सांगितल्या.यावेळी आशाताई शिंदे यांचे मनोगत झाले आरंभी डॉ धनसडे व टीमच्या वतीने खासदार चिखलीकर व मान्यवरांचा सत्कार केला .डॉ धनसडे तसेच याचे आई वडील भाऊ याचा प्रतापराव पाटील यांनी शाल व फोटो देऊन सत्कार केला संचलन विक्रम कदम यांनी तर आभार डॉ शमा बुक्तरे यांनी केले .