कुठलीही परीक्षा दिल्यानंतर सर्वात जास्त उत्सुकता ही त्याच्या निकालाबाबत असते अगदी याच प्रमाणे
महाराष्ट्रात झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकाच्या पाच टप्प्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात आज दिनांक ४ जून २०२४ वार मंगळवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पुर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा तयारीनिशी सज्ज झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली होती.
राज्यात कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ही ठेवण्यात आलेला आहे. अशी एकूण तयारी प्रशासनाने दाखवलेली आहे.
आपल्या सभोवतालचे प्रत्येकजण 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालाची तीव्र अपेक्षेने वाट पाहत आहोत ते ईतक्यात कळेल ही, याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या 97 कोटी लोकांनी दिलेल्या मतांचे निकाल कधी जाहीर केले जातील, यावरही लक्ष ठेवून आहे.
“लोकसभा निवडणुकीचा निकाल हा राजकीय स्थैर्य, ठरलेल्या धोरणातील सातत्य आणि गुंतवणूकदारांच्या भावना यासारख्या घटकांवर प्रभाव पाडणारा असतो.
निवडणुकीपुर्वी जनमताचे वारे कसे वाहत आहेत याचा शास्त्रशुदध अभ्यास किंवा भाकीत दृष्टीने काढलेला परिणामामुळे
किंवा सध्याच्या बाजारातील अस्थिरतेचे श्रेय निवडणुकीच्या निकालाबाबत विविध असंतोषजनक बातम्या आणि अपडेट्स दिले जात असल्याने कदाचित वातावरणात तणाव निर्माण होऊ शकते. परंतु
राजकारणात कधीही कोणी संपत नसतं’ हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं निरीक्षण आहे. संपण्याच्या, वा संपवण्याच्या, वल्गना कायम विरोधी बाजूंनी एकमेकांवर केल्या जातात.
असं असलं तरीही, काही निवडणुका या कारकीर्दी, घडवणा-या वा बिघडवणा-या असतात. त्यांच्या निकालांचा परिणाम पुढचा काही काळ या कारकीर्दींचं जे राजकारण असतं, त्याला एक तर उंचीवर नेऊन ठेवणारा असतो किंवा अगदी काही काळ मागे नेणारा. त्या निकालानं काहींची कारकीर्द झळाळून निघतो, तर काहींची कारकीर्द झाकाळतो. शिखरावरचा असो वा पायथ्याचा, तो काळ किती लांबीचा असेल, कोणालाही भाकित वर्तवता येणं कठीण.
त्यासाठीच त्यांचा राजकीय कारकीर्दीतला आजवरचा सर्वांत महत्वाचा निर्णय या निवडणुकीत पणाला लागलेला असतो. त्यामुळे सर्वत्र या निकालाची आतुरतेने प्रतिक्षा करताना दिसतात.
अश्या वेळी आपल्या सारख्या जनसामान्यांनी येणाऱ्या निकालाचा स्वीकार करून त्याचे स्वागत करायला पाहिजे.
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211