दुपारी ची वेळ, सुर्य नारायण आग ओकत होता. उष्मा असाह्य झाल्याने जीवाची नुसती काहिली होत होती. रेल्वे स्टेशन मधील प्रतिक्षालय आणि शरीराचं तापमान सामान्य राखण्यासाठी भरमसाठ उपाय करून पाहण्याचा विडाच जणू त्या तेथिल लोकांनी उचलला होतो की काय?पण सारे प्रयत्न निष्फळ होऊ लागले होते. मला ही तेवढाच त्रास होत होतो. पण तेवढ्यात माझे लक्ष दुसरीकडे वळले…तो ही अंगाची होणारी आग आणि अंगातून येणारा घाम यावर काही तरी उपाय योजना करताना दिसला.
मी त्याच्या ही हालचाली पाहत होते. तवढ्यात लाईट गेली. त्यामुळे डोक्यावर रेंगाळत चालणारा पंखांही बंद झाला. माझ्या आणि त्यांच्या सारखे सगळेचजण तिथे बेचैन, चिडचिडे आणि वैतागलेले दिसत होते…तो अजूनही काही तरी खटपट करतच होता…
त्यांच्या त्या करामती पाहून मला हसू येत होतं आणि तेवढ्यात माझी त्याची नजरानजर झाली. मी पटकन मान खाली घातली. तो ही आता काहीच न करता पटकन गप्प बसला…माझी ही तगमग लक्षात आली असावी त्याला…पण मी कृतीशील नव्हते. हाच फरक असतो कदाचित बाई आणि माणसात…मी या विचारात असतानाच तो त्याने खूप सारे न्युज पेपर आणले आणि माझ्या शेजारी येऊन शांतपणे बसून वारं घालू लागला.
किती सहजता दिसत होती आता त्याच्या ह्या कृतीत! गंमत म्हणजे वार्याच्या त्या झोताने आमची तगमग कमी झालेली नव्हती. पण काहीसा तो निवांत झालालेला दिसला…आता हा निवांतपणा वार्यामुळे आलेला होता की, त्याच्या कृतीतून व्यक्त होणार्या आपूलकिचा होता.
हे मात्र समजायला मार्ग नव्हता?
सौ.रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211