कंधार—शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या कंधार तालुका शाखेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महात्मा बसवेश्वर यांची ८९३ वी जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात कंधार येथे संपन्न झाली. या कार्यक्रमास गुरुउपदेश सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी केले.
शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्घाटन डॉ .संजय पवार अध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्र.मं.नेहरुनगर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय भोसीकर माजी जि.प.सदस्य, रामचंद्र येईलवाड राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल राज्याध्यक्ष,माजी जि.प.सदस्य अँड.विजय धोंडगे, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, माजी पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख परमेश्वर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बालाजी पेठकर,एम. आय. एम. विधानसभा अध्यक्ष अब्बु भाई, सोशल मिडिया प्रमुख सतीश देवकत्ते, शिवा संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता खंकरे,राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, सेवा जनशक्ती पक्षाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते विठ्ठल ताकबिडे, शिवा कर्मचारी महासंघ राज्य सरचिटणीस संजय कोठाळे, जिल्हा संपर्कप्रमुख इंजि.अनिल माळगे ,जिल्हाध्यक्ष संभाजी बुड्डे,संभाजी पावडे ,रविंद्र पांडागळे,शुभम घोडके आदींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.एस.मंगनाळे यांनी तर सुत्रसंचलन संभाजी पावडे यांनी तर आभार बाबुराव फसमले यांनी मानले.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
माईचं मंदिर कंधार दुपारी ६ वाजता मिरवणुकीचा प्रारंभ तर समारोप नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे झाला .महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीमध्ये कंधार तालुक्यातील सर्व विरशैव लिंगायत बंधू आणि भगिनींनी तसेच सर्व समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होती.
यावेळी शिवाजीराव कहाळेकर,डी.जी.पांडागळे, विनायक कल्याणकस्तुरे, गणेश गोरे, सतिश घोडके, त्र्यंबक भोसीकर , बालाप्रसाद मानसपुरे, भुजंगराव कारामुंगे,बाबुराव अभंगे, मल्लिकार्जुन किडे, अभिषेक मानसपुरे, बालाजी कल्याणकस्तुरे,प्रा.रामकिशन पालीमकर,बाबुराव कैलासे, चंद्रकांत गोंड, शिवराज भोसीकर,एम.डी.पेठकर, बी.टी.भुरे,नामदेव कल्याणकस्तुरे, साधू वडजे,एम.जी.भुरे,डी एन मंगनाळे,ज्ञानेश्वर घोडके , बाबुराव मुधळे, चक्रधर हाळीघोंगडे , शिवराज घोडके, हरिहर विश्वासराव आदीसह महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीमध्ये कंधार तालुक्यातील सर्व विरशैव लिंगायत बंधू आणि भगिनींनी तसेच सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.