नांदेड:( दादाराव आगलावे)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने, तेलंगणा राज्यातील श्री क्षेत्र बासर येथे श्री विद्या सरस्वती पूजन विद्यारंभ संस्कार सोहळा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये संपन्न होणार आहे.
अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविकासातून राष्ट्र विकास या संकल्पनेतून अखिल मानव जातीच्या सर्वांगीण विकासासाठी सेवा मार्ग कार्यरत आहे. सेवा मार्गातील असंख्य सेवेकरी प्रतिनिधी राष्ट्रहीत व विश्वशांतीचे ध्येय हाती घेऊन गेल्या 70 वर्षापासून विविध अभियानातून मानवता व भारत मातेची सेवा करीत आहेत.
परमपूज्य गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनाखाली सेवा मार्गाचे ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान, 20% अध्यात्म व 80 टक्के समाजकार्य या सूत्रातून जन-उद्धाराचे कार्य निरंतर करीत आहे. याचाच एक भाग म्हणून परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने गुरुपुत्र श्री नितीन भाऊच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र बासर येथे रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 9 वाजता नांदेड, लोहा, अर्धापूर, दुपारी 12 वाजता संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, दुपारी 3 वाजता हिमायतनगर, किनवट, माहूर, भोकर तसेच सोमवारी दिनांक 17 जून रोजी सकाळी 9 वाजता मुखेड, देगलूर, मुदखेड, हदगाव, दुपारी 12 वाजता बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, दुपारी 3 वाजता धर्माबाद, बिलोली, नायगाव येथील बालकांच्या हस्ते श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त सेवेकर्यांनी सहभाग नोंदवण्याचे आव्हान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.