कंधार : (प्रतिनिधी एस.पी.केंद्रे )
दरवर्षी प्रमाणे लातूर बोर्डाकडून मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा 96.43% लागला आहे.या परीक्षेला एकुन विध्यार्थी बसले होते 119 त्यापैकी 115 विध्यार्थी उतिर्ण झाले आहेत. तर विषेश प्राविण्य श्रेणी मध्ये 53 उतिर्ण झाले असून 44 विध्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उतिर्ण व्दितीय श्रेणी मध्ये 18 विध्यार्थी उतिर्ण झाले आहेत. महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दरवर्शी प्रमाणे याही वर्षी यशाची परमपरा कायमच ठेवली आहे.
सर्व गुनवंत विध्यार्थांचे व सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परीषद सदस्य मा.उपसभापती सांभाजीराव पाटील केंद्रे व संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे माजी सरपंच तथा चेअरमन शिवाजीराव पाटील केंद्रे , सहसचिव सौ. रेखाताई शिवाजीराव केंद्रे , प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, पर्यवेक्षक व्यंकट पुरमवार सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील दहावी 119 विद्यार्थ्यां पैकी 115 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. एकुण निकाल 96.43% टक्के लागला असून प्रथम क्रमांक वाघमारे ऋषीकेश उध्दव 92.40 टक्के,व द्वितीय क्रमांक घुगे स्वाती शंकर 91.60 टक्के तर तृतीय क्रमांक वाघमारे वैशाली शिवकांत 91.20 टक्के सांगळे माधव संजय 90.80 टक्के , लाडेकर शिवकन्या ज्ञानेश्वर 90.60 टक्के मिळविला आहे. अशी माहिती शंभू वाघमारे कारकून यांच्याकडून देण्यात आली आहे.
या निकालाचे सर्वश्रेय विद्यार्थ्यांचे पालकांचे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आहे असे संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले व सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
या वेळी परीक्षा विभाग प्रमुख सुर्यकांत श्रीमंगले,मोहीत केंद्रे सर, संस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.अरूण केदार , विषय शिक्षक चंद्रकांत पडलवार सर, अमित लोंड सर,अनिल बोईवार सर,सौ.सुनीता इप्पर मॅडम, शिवाजी मेंडके सर, किशन ठोंबरे सर, महेंद्र बोराळे सर,प्रा.हाणमंत भालेराव ,नाईक एम एस ,एस.पी केंद्रे, बालाजी केंद्रे, संभु वाघमारे, कृष्णा केंद्रे , मुकेश केंद्रे यांच्याह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विध्यार्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.