नांदेड: मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले असून त्यांना विविध ठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तरोडा खुर्द नांदेड येथील युवक साईनाथ प्रकाश कोरडे पाटील हे तरोडा खुर्द येथील हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणास बसले असून त्यांचा हा दुसरा दिवस आहे. त्यांच्या उपोषणास तोरडा गावातील असंख्य युवकांनी व मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दर्शविला आहे.