रोजचं माझं लिखाण हा माझा रियाज असतो.. न चुकता जसा व्यायाम होतो तसच रोज आर्टीकल लिहीते .. जसा मला लिहायचा नाद लागला तसाच माझ्या वाचकांना वाचनाचा नाद लागला.. वर्तमानपत्र वाचून झालं की सोनलचं लिखाण वाचणं हा छंदच लागला पण रियाजाचीही पुस्तके होवु शकतात आणि त्याला इतकं यश मिळु शकतं ही भगवंताची आणि माझ्या भगवंतरुपी वाचकांची कृपा..कारण मी कितीही चांगले लिहीले आणि तुम्ही वाचक नसतील तर माझ्या लेखणीला काहीही व्हॅल्यु नाही .. म्हणुनच हे नववे पुस्तक मी माझ्या वाचकांना समर्पित केलं आहे..
आधी माझा वाचक , त्यानंतर तो मित्र झाला आणि आता तो या दोन पुस्तकाचा प्रकाशक झाला.. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.. विधीलिखीत , ऋणानुबंध , हे शब्द तोकडे पडावेत इतकं सुंदर स्वागत बुलढाणा येथे जयंतची बायको स्वाती हिने केलं.. माझी दृष्ट काढून मला घरात घेतलं.. त्यावेळी तिच्या मनात कणभरही शंका आली नाही की ही माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे.. ही शुद्धता आणि तिने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी आयुष्यभर जपेन..
कालच्या कार्यक्रमाला असलेले प्रमुख पाहुणे हेही माझे वाचक होते हे मला इथे आल्यावर समजलं आणि नक्कीच समाधान वाटलं.. मा. डॉक्टर खोब्रागडे मॅम यांनी एक किस्सा त्यांच्या भाषणात सांगितला तो असा.. ” त्या mpsc च्या परिक्षेसाठी कुठेतरी निघाल्या होत्या तेव्हा त्यांच्या खालच्या बर्थवर दोन मुले mpsc च्या परिक्षेसाठी निघाली होती.. जाताना ते दोघे एक पुस्तक वाचत होते त्या पुस्तकाचे नाव होते ” बियॉन्ड सेक्स ” मग त्यांनीही ते पुस्तक वाचलं..” हे ऐकून खरच समाधान वाटलं.. भगवंताने माझ्या हातात फक्त लेखणी दिली नाही तर त्याच्यासोबत अनेक मित्र ,वाचकही दिले.. आता माझी जबाबदारी नक्कीच वाढली आहे कारण साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो त्यामुळे तो स्वच्छ असायलाच हवा.. लैगिक ज्ञान देणं ही मोठी जबाबदारी मी घेतली आहे पण माझ्या वाचकांना नम्र विनंती आहे की ते ज्ञान आधी निट आत्मसात करा. त्यातील पैलु सनजावुन घ्या.. उथळ ज्ञान कधीही धोकादायकच असतं.. प्रत्येक व्यक्तीगाणीक ह्या गोष्टी बदलतात त्यामुळे त्याचे पॅरामीटरही बदलतात..प्रत्येकवेळी प्रणय हा सुखद किवा आधीपेक्षा चांगला होइलच असं नाही पण वेगळा नक्कीच होइल .. त्या वेगळेपणातलं सौंदर्य आपल्याला जपता यायला हवं..
डॉक्टर साधना भवटे मॅम ज्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या त्यांनी तर मी त्यांच्याशी मैत्री करावी ही इच्छा व्यक्त केली..यापेक्षा जगात सुंदर काहीही नाही.. मा.प्रेषित सिध्दभट्टी सरानी सांगितले की पुस्तके विकत घेउन वाचा हा किती मौल्यवान संदेश होता ना.. शशिकांत इंगळे सरानी तर उत्तम सूत्रसंचालन केलं तेही माझे वाचक आहेत आणि दांदडे सरानी तर आभारप्रदर्शन इतकं सुंदर केलं की याआधी कधीही कुठल्याही कार्यक्रमात इतकं सुंदर आभार प्रदर्शन कोणीही केलं नसेल.. कालच्या हॉलचं नाव गोवर्धन होतं आणि मी कृष्णभक्त त्यामुळे त्या दोन्ही शब्दाची सांगड घालत त्यांनी जी शब्दपुष्प चौफेर उधळली ते ऐकून समाधान वाटलं..
या पुस्तकातील एका लेखाचं कार्यक्रमात वाचन करण्यात आलं आणि ज्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले ते म्हणजे सुप्रसिद्ध ॲक्टर गणेश देशमुख. मी माझ्या श्रीकृष्णाला एक पत्र लिहीलं होतं त्याचं वाचन ऐकताना जाणवलं हे मी लिहीलय ??.. याचं कारण त्यांच्या वाचनाची जादु.. ते स्वतः थेटर आर्टीस्ट असल्याने त्यांनी ते इतक्या सुंदर पध्दतीने वाचलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं..माझ्या श्रीकृष्णालाही ते नक्कीच भावलं असेल.. बुलढाणा वासीयांचं प्रेम माझ्या शेवटच्या श्वासापर्य्नत स्मरणात राहिल आणि कालचा रंजक सोहळाही.. आज सकाळी या कार्यक्रमाबद्दल मी माझ्या मित्राशी फोनवर बोलत होते तर तो पटकन म्हणाला , सोनल तु कुठेही गेलीस तरी तुला चांगलीच माणसे भेटतात आणि हे हजार टक्के खरं आहे..
पुन्हा एकदा जयंत ( प्रकाशक मित्र वाचक ) आणि माझे वाचक , चाहते यांची आजन्म ऋणी राहिन आणि मनापासून कृतज्ञ सुध्दा.. असच प्रेम माझ्यावर आणि लेखणीवर राहुदेत हीच सदिच्छा..मी कधीही कोणाला रीप्ल्याय केला नाही तर त्याचा अर्थ गर्व समजू नये कारण वाचन ,लिखाण , जप ,काउंसीलींग , व्यायाम आणि घरातील कामं यात व्यस्त असल्याने उत्तर देता येत नाही.त्यासाठी सगळ्याची माफी मागते.. लिखाणातून मी रोज तुमच्याशी बोलत असेनच..
हरे कृष्ण..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist