खेड्यात जन्म झाल्याने आणि तिथेच राहिल्यामुळे , आणि कधीही शहरात न गेल्यामुळे घराला कुलूप लावलं जातं किवा लावायचं असतं ही कंसेप्टच माहीत नव्हती कारण माहेरी मी आमच्या घराला कधी कुलूप पाहिलेच नाही.. एकतर कोणी ना कोणी सतत घरात असायचं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीवर असलेला विश्वास आणि प्रेम.. पण आजही इतक्या वर्षाने माझ्या माहेरी घराला कुलूप लावलं जात नाही.. घरातील सगळे बाहेर गेले तरीही दरवाजा ओढून कडी लावलेली असते.. कारण प्रत्येकाचा त्याच्या नशीबावर आणि भगवंतावर तितकाच विश्वास आहे.. हे खेड्यात सहज शक्य आहे कारण आपण प्रत्येक व्यक्तीला ओळखतो.. सगळे गाववालेच असतात.. पण हे शहरातही होतं हे पाहून मला आनंद झाला.. कमाल वाटली.. त्यांच्या विश्वासाबद्दल आदर वाटला… खुप काही झालं..
आता बुलढाणायेथे मी माझ्या मित्राच्या घरी ३ दिवस राहिले.. स्वाती म्हणजे मित्राची बायको हिने फ्लॅट लॉक केला आणि चावी दरवाज्याला अडकवली.. खाली कुलूप आणि त्याच कुलपाची एक फुटावर सगळ्याना दिसेल अशी किल्ली.. मी पाहिल्यावर हसत म्हटलं , अगं चोर आला तर त्याला कुलूप उघडायचे तरी कष्ट कशाला ??.. फक्त कडी लावुन घे ना..
किल्ली दाराला अडकवुन आम्ही तिघेही बाहेर निघुन गेलो आणि तिला दुधवाल्याचा फोन आला , तो म्हणाला , दुध फ्रीजमध्ये ठेवून किल्ली दाराला ठेवलेय हा.. थोड्या वेळात तिची कामवाली आली तिने दार उघडलं , साफसफाई केली आणि किल्ली दाराला अडकवुन निघून गेली.. आम्ही दिवसभर घराबाहेर होतो.. एकदाही तिने घराचा विषय काढला नाही.. किवा किल्ली दाराला आहे म्हणुन काळजी नाही.. खरच कौतुकास्पद गोष्ट आहे ही.. मी विचार केला मला जमेल का हे ??.. आपल्या नशीबातलं कोणीही काहीही काढून घेउ शकत नाही हे कितीही खरं असलं तरीही क्षणभरही कोणावरही अविश्वास नाही ही किती मोठी गोष्ट स्वातीने नकळत मला दिली.. तिच्या नवऱ्याची मी मैत्रीण आणि त्यांच्याच घरात रहातेय याचा तिच्या वागण्याबोलण्यावर कणभरही फरक नाही. किती तो नात्यावर आणि मैत्रीवर असलेला विश्वास.. ही गोष्ट सुध्दा नकळत तिने शिकवली.. मी हे लिहीते आणि स्वाती ते जगते आणि तेही सहज.. माझ्या हातात गरमागरम ताट देतांना म्हणाली , अगं माझ्या नणंदा आल्या की मी असच करते किती तो साधेपणा ना..कसलीही अपेक्षा नाही आणि पुढे म्हणाली , माझी भावजय मला असच ताट हातात देते.. हेवा वाटला त्या निरागसतेचा , हेवा वाटला नसलेले नाते जोडण्याचा , हेवा वाटला तिच्या समजुतदारपणाचा आणि हेवा वाटला माझ्या नशीबाचा..
तिने माझ्याकडून शिकावं असं माझ्याकडे काही आहे की नाही माहीत नाही पण निरीक्षणातुन मी मात्र तिच्याकडून अनेक गोष्टी शिकले.. तिचं मुलींवर असलेले प्रेम , मुलगी वयात आल्यावर मी तिला म्हटलं , आजपासून आपण दोघी मैत्रीणी हे वाक्य ती इतकी सहज बोलून गेली की माझ्यातील आई आणि लेखिका निशब्द झाली.. असं म्हटलं जातं की पुस्तकाच्या कव्हरवरुन आतील पुस्तकाला जज करु नये तसच बाह्यरुप पाहून माणसाची पारख कधीही करु नये हेही तिने कृतीतुन सांगितलं.. पुण्या मुंबईतल्या लोकांना हे असं जमेल का ?.. यासाठी मातीशी नाळ जुळायला हवी आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास हवा..
त्या १०० रुपयाच्या कुलुपावर जर ती इतका विश्वास ठेवु शकते तर माणसावर ती १०००% विश्वास ठेवु शकते.. अशी माणसे फार विरळ .. आणि ज्याला ती गवसली त्यांनी ती जपावी इतकच इथे म्हणावं वाटतं.. जया आणि स्वाती दोघांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते .. इथे पुण्यात आल्यावर बुलढाणा आणि हे दोन मित्र आणि त्यांची माउ , भुभु यांना मिस करतेय..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist
.