पावसाळा व शाळा

 

पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो,
पावसामुळे निसर्गात खुप सारे बदल होतात तसेच आपण ह्या पावसात खूप मज्या करतो.
पाऊस सुरु होण्या आधी, उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. आपण सर्वच गर्मीत येणाऱ्या घामा ने अस्वस्थ झालेले असतो, आणि मग त्या काळ्याकुट्ट ढगांकडे पाहून सगळ्यांचा मनात एकच इच्छा येते, ती म्हणजे कधी ह्या पावसाला सुरुवात होते आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.
पहिला पाऊस पडल्याने सर्वत्र मातीला सुगंध येतो. झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आखलेल्या नद्या, नाले पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरुवात होते, पावसामुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्यात शेतामध्ये पिक डोलू लागते.

पावसाळ्यातच शाळा ही सुरू होते. पावसाळ्यात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते.
शाळेत जाण्यासाठी नवीन बॅग, वह्या, पुस्तकां सोबतच
नवीन रेनकोट मिळतो. पावसात भिजायला प्रत्येकाला आवडतो.

पाऊस हा कधी कधी इतका पडतो कि सगळीकडे पाणी पाणीच होते आणि शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो तो खूप छान दिसतो. बेडूक ओरडतात,झाडांना पालवी फुटते, ढगांच्या ईशार्यावर मोर रानात नाचू लागतात. असे अनेक सप्तरंगी बदल आसपास घडुन येतात. अश्या पद्धतीने मे महिन्यात गर्मी ने तापलेले वातावरण पावसाने अगदी थंड आणि हिरवळीचे होते‌.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *