गंगाबाई माध्यमिक विद्यालय सावरगाव येथील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार

मुखेड:तालुक्यातील गंगाबाई माध्यमिक विद्यालय सावरगाव (पिर) विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव गंगाधरराव राठोड यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. गंगाबाई माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात नेहमी नैपुण्य मिळवतात. येथील मुख्याध्यापक एम.डी. सूर्यवंशी हे हाडाचे क्रीडा शिक्षक असल्यामुळे या शाळेचे विद्यार्थी राज्य पातळीवर क्रीडा क्षेत्रात पोहोचलेली आहेत. संस्थेच्या वतीने नाही पुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अनेक वेळा सन्मान करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पर्वा शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या
कु.आराध्या शिवराज वडजे, समर्थ संतोष पाटील, कु.स्वाती स्वप्नील वाडेकर हे शिष्यवृत्तीधारक बनल्यामुळे संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल यावेळी मुख्याध्यापक मनोहर सूर्यवंशी, श्रीराम पवार, नामदेव शिंदे, स्वप्निल वाडेकर, आरती वडजे यांची उपस्थिती होती.

यावेळी संस्थेचे सचिव गंगाधराव राठोड म्हणाले की, गंगाबाई विद्यालयातील गुणवत्ता ही दिवसेंदिवस वाढत असून येथील शिक्षक वृंदाच्या मेहनतीमुळे हे यश मिळत आहे.

यावेळी त्यांनी मुख्याध्यापक मनोहर सूर्यवंशी यांचे विशेष अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *