कंधार | धोंडीबा मुंडे
कंधार तालूका म्हणजे मन्याड खोर्यातील डोंगर-दऱ्याचा तालूका म्हणून ओळखतो,याच तालुक्यातील मुंडेवाडी येथील रहिवासी असलेल्या मुंडे कुटुंबातील सख्या बहिण भावाने निट परीक्षा-२०२४ मध्ये भरघोस गुण घेऊन केले,गावांचे,कुटुंबाचे व आई-वडिलांचे स्वप्न केले साकार!
याबाबत सविस्तर माहिती अशी कि कंधार तालुक्यातील डोंगराच्या उतरतीला असलेले अन् गुणवंताची खाण असणारे गाव म्हणजे मुंडेवाडी या छोट्याशा वस्तीमध्ये जन्म झालेल्या माधवराव मुंडे यांचा नातू व मारोती माधवराव मुंडे यांचा मुलगा संदीप मारोती मुंडे या चिमुकल्याने नुकताच निकाल लागलेल्या वैद्यकीय चाचणी परीक्षा (निट) परीक्षेत २०२४ च्या ७२० पैकी ६९० गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशास पात्र झाला आहे. तसेच त्यांची सुकन्या ऋतुजा मुंडे हिने ७२० पैकी ५८५ गुण मिळवत प्रवेशपात्र झाली.
मुंडे कुटुंबातील सख्ये बहिण भाऊ एमबीबीएस साठी पात्र ठरलेत आहेत, कु.ऋतुजा ही वक्तृत्व कलेत निपुण आहे.ती आठव्या वर्गात असतांना शालेय स्तरावर आपल्या गुणांचा ठसा उमटविला.डाॅ.केशवरावजी धोंडगे यांनी तिचे कौतुक केले होते.
आई-वडिलांसह सर्व कुटुंबाचे नावलौकिक वाढविला आहे.संदिप व ऋतुजा या भावंडावर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होतो आहे,
सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेल्या व कुठल्याही वैद्यकीय वारसा नसलेल्या संदीप व ऋतुजा यांनी आपल्या आई-वडील व गुरुंच्या मार्गदर्शना खाली अहोरात्र,जिद्दीने मेहनत घेत नेट परीक्षेत घवघवीत यश मिळविले,