कंधार ; प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करताना अधिकृत शासनमान्य कृषी सेवा केंद्रातूनच पक्की बिल घेऊन खरेदी करावी काही अडचण आल्यास संबंधित गावाची कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन विठ्ठल भानुदास गीते तालुका कृषी अधिकारी कंधार यांनी शेतकऱ्यास मार्गदर्शन दि .7 जुन रोजी खरीप हंगाम पूर्व नियोजन गाव बैठकीत पांगरा येथे केले .
कंधार तालुक्यात सर्वसाधारण लागवडी लायक क्षेत्र 68300 हेक्टर असून 2024 मध्ये 68300हे वर विविध पिकाचे पेरणी प्रस्तावित आहे यामध्ये प्रमुख पीक कापूस असून कापूस पिकाची 28655 हेक्टर सोयाबीन 23 हजार 500 हेक्टर तुर 6453 हेक्टर मूग 1600हेकटर उडीद 1200हेक्टर हळद 1800 हेक्टर व इतर कडधान्य व गळीत धान्य चारा पिकांचा समावेश आहे.
पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी तसेच बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. सोयाबीन पिकाच्या बाबतीत प्रत्येक वर्षी नवीन बियाणे घेण्याची आवश्यकता नाही सोयाबीन हे स्वपरागी करत असल्या कारणामुळे घरचे बियाणे स्वच्छ करून त्याची उगण क्षमता तपासून ती 70% च्या वर असेल तर पेरणी करिता वापरावे सोयाबीन पिकाची पेरणी करताना बीबीएफ तसेच रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून मूलस्थानी मृद व जलसंधारण झाल्यामुळे पिकाला पावसाच्या खंडामध्ये फायदा होते व वरंबा कायम वापस स्थितीत असल्यामुळे वाढ चांगली होते .याबाबतीत श्री विठ्ठल भानुदास गीते तालुका कृषी अधिकारी कंधार यांनी शेतकऱ्यास मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक
श्री कृषी सहाय्यक शिवा होनराव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य घोरबांड यांनी केले सदरील कार्यक्रमाकरिता गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालायावेळीडॉ. शरद रावसाहेब सुरनर,
सहा. प्राध्यापक व विभाग प्रमुख, मत्स्यशास्त्र विभाग, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट, जि. लातूर यांनी मत्स्य व्यवसाय बद्दल मार्गदर्शन केले .प्रगतशील शेतकरी कृष्णा भालेराव यांनी नैसर्गिक शेती बद्दल मार्गदर्शन केले यावेळी कृषी सहाय्यक गोविंद एल्कुलवार तसेच मंडळ कृषी अधिकारी भारत वाठोरे व आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार तसेच गावातील शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.