नांदेड जिल्ह्यात आज 393 कोरोना बाधितांची भर, 494 व्यक्तींना सुट्टी, 8 जणांचा मृत्यू.


#नांदेड_दि. 13

  रविवार 12 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 494 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 393 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 157 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 236 बाधित आले.   आजच्या एकुण 1 हजार 152 अहवालापैकी  744 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 11  हजार 484 एवढी झाली असून यातील  7  हजार 355 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 759 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.    

या दोन दिवसात आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात कैलास नगर नांदेड येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, शारदा नगर नांदेड येथील 65वर्षाचा एक पुरुष व तेहरा नगर नांदेड येथील 38 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, नांदेड येथे तर धानोरा ता. नायगाव येथील 75 वर्षाचा पुरुष, भावसार चौक, नांदेड येथील 62 वर्षाची एक महिला, दिनांक 13 रोजी हदगाव येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविद हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हदगाव तालुक्यातील कोठाळा येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालयात तर रामपूरथडी ता. बिलोली 62 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार करताना मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 311 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 20, भोकर कोविड केंअर सेंटर 5, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 11, किनवट कोविड केंअर सेंटर 18, माहूर कोविड केंअर सेंटर 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, हदगाव कोविड केंअर सेंटर 10, पंजाब भवन/एन.आर.आय./महसूल भवन/होम आयसोलेशन 324, कंधार कोविड केंअर सेंटर 8, लोहा कोविड केंअर सेंटर 7, मुदखेड कोविड केंअर सेंटर 2, नायगाव कोविड केंअर सेंटर 25,  उमरी कोविड केंअर सेंटर 13 अशा एकूण 494 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  


आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 98, नांदेड ग्रामीण 6, अर्धापूर 1, हदगाव तालुक्यात 1,  माहूर तालुक्यात 2,  नायगाव तालुक्यात 1, हिमायतनगर तालुक्यात 5, उमरी तालुक्यात 9, लोहा तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 2, भोकर 1, किनवट 6, मुखेड १६, धर्माबाद 1, बिलोली 3, हिंगोली 3 असे एकुण 157 बाधित आढळले.   तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 120, हदगाव 4, अर्धापूर 7, किनवट 27, नायगाव 8, मुखेड 24, धर्माबाद 8, परभणी 1, आदिलाबाद 1, नांदेड ग्रामीण 5, मुदखेड 12, लोह 7, कंधार 6, भोकर 2, उमरी 2, निझामाबाद 1, जम्मू काश्मीर 1असे 236 बाधित आढळले.

जिल्ह्यात 3 हजार 759 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 267, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 736, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 79, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 13, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 141, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 118, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 169,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 65,

लोहा कोविड केअर सेंटर येथे 108, हदगाव कोविड केअर सेंटर 58, भोकर कोविड केअर सेंटर 30, कंधार कोविड केअर सेंटर येथे 58,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 194, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 30, मुदखेड कोविड केअर सेटर 74,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 37, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 58,

धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, उमरी कोविड केअर सेंटर 87, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, बारड कोविड केअर सेंटर 22, खाजगी रुग्णालयात 349 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *