एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईट च्या उजेडात एक साधारण पंदरा वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण मग्न होता वाचनात.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खुप जिन्यासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.
रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिरा कडे आलो. तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस.
सर माझ्या घरात लाईट नाहि. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी अयपथ नाही.
बाळ तू मला बघून गोड हसलात का?
सर तुम्ही देव आहात का.
नाही रे.
सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.
ते जाऊदे तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊच पार्सल आणलं आहे.
सर म्हणूनच मी हसलो. मला माहित होत. तो कोणत्याही रूपात येइल. पण मला भुका नाहि ठेवणार. मी जेंव्हा जेव्हा भुका असतो तो काहींना काहि मला देतोच.
कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुका होतो पण निर्भीड होतो. मला माहित होत. तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार. आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना !
मी निशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडत होतो. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवल होत.
: त्याने तो अर्धवट खाऊ खाला आणि म्हणाला सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्ध माझ्या आईला देऊन येतों. माझे डोळे तरळले. त्याला काहि विचारण्या अगोदरच त्याने सार काहि कृतीतून सांगितलं होत. तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओजळीत पारिजातकाची फुल होती.
सर माझी आई सांगते ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओजळीभर फुल तरी वहावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणा कडे पाहिलं तर तेही मला त्या मुलांच्या गोड हसण्या सारखं वाटल.
नंतर सगळीकडे भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा कॉलेज बंद झाल्या. देवळ ओस पडली. देवळांन टाळ ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळा कडे डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाची पायरी वरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटल मला. ह्या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा? काय खात असेल. कस जगत असेल. ना ना प्रश्न आव आणून उभे राहिले.
ह्या महामारीत असंख्य प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र आजारी होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसत्काराला मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळा वर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला. सर,
अरे तू इथे काय करतोस ?
सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाड भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईट हि बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली. काहि झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तीन सांगितलं आहे. त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शिव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणस यायची आणि इथे मेलेली. ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो. सर मी हार नाही मानली. आई सांगायची ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.
मग तुंझी आई कुठे आहे.
सर ती ह्या भयानक आजारात गेली. तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिली. 14 दिवस इथंच ह्या खोपीत होम कोरनटाईंन राहिलो. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्या साठी असतो, असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ करून घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.
सर तरी मी हरलेलो नाही.पण दुःख एव्हढच आहे कि मी पास झालेलो पाहायला आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खूश असेल हे माझं यश बघून. कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत. पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.
सर तुम्ही का वाईट वाटून घेता , तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला. सर तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याश्या डब्यातून साखर आणली होती.चिमूटभर माझ्या हातावर ठेवली . सर तोंड गोड करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्या साठी तोंड धुतले.
सर, मला माहीत होते. देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार. त्याने पुढे काहि बोलण्या अगोदरच मी माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलांच्या हातावर टेकविला आणि त्याची पाठ थोपटून निमूट पणे बाय करून स्मशाना बाहेर चालू लागलो. आता दर महिन्याला मी त्याच रिचार्ज करतो नसांगता…..
मी त्या मुलांच्या डोळ्यात देव पहिला.
चंद्रशेखर गावकर उर्फ (बंड्या गावकर )
9870230698